रोहित शर्माचा आयपीएलमध्ये आणखी एक नवा विक्रम

मुंबई : २४ एप्रिल – पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात मुंबईला इंडियन्सला पराभवाचा सामना करावा लागला. आयपीएलच्या 14 व्या पर्वात मुंबईने आतापर्यंत 5 सामने खेळले. त्यापैकी मुंबईला 3 सामन्यांत पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. असं असलं तरी मुंबईचा संघनायक रोहित शर्मा तुफान फॉर्मात आहे. पंजाबविरुद्धच्या सामन्यात बॅटिंगला मैदानात उतरल्याबरोबर रोहितने खास विक्रम आपल्या नावे केला.

रोहित शर्माने आयपीएलच्या अनेक पर्वांमध्ये विविध रेकॉर्ड्स केलेत. सर्वाधिक पर्वांचं विजेतेपद मिळवणाऱ्या संघनायकांमध्ये रोहित शर्माचा हात कोणताही संघनायक धरु शकणार नाही. त्याने मुंबईला आतापर्यंत 5 करडंक जिंकून दिलेत. पंजाबविरुद्धच्या सामन्यात शुक्रवारी रात्री बॅटिंगसाठी मैदानात उतरलेल्या रोहितच्या नावे 200 डावांत बॅटिंग करणारा फलंदाज म्हणून विक्रम नोंदवला गेला. त्याने पंजाबविरुद्ध खेळताना 200 व्या डावात फलंदाजी केली. असा कारनामा आणखी कोणत्याही फलंदाजाला जमला नाहीय.

Leave a Reply