पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस नागपुरात दाखल

नागपूर : २४ एप्रिल – महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. उपलब्ध ऑक्सिजन अपुरे असल्याने विशाखापट्टणम येथून ऑक्सिजन आणले जाणार आहे. त्यासाठी देशातील पहिली ऑक्सिजन ट्रेन पाठविण्यात आली होती. विशाखापट्टनमहून निघालेली ऑक्सिजन एक्सप्रेस शुक्रवारी संध्याकाळी ७ च्या सुमारास नागपूर रेल्वेस्थानकावर दाखल झाली.
कोरोना रुग्णावर उपचारासाठी परराज्यातून ऑक्सिजनची जुळवाजुळव करण्यात येत आहे. भारतीय रेल्वेतर्फे विशाखापट्टणम येथून ऑक्सिजन वाहून आणण्यासाठी रिक्त मालगाडी पाठविण्यात आली होती. सोमवारी रात्री कळंबोली येथून १६ टन क्षमतेचे सात रिकामे टँकर घेऊन पहिली ऑक्सिजन एक्स्प्रेस रवाना झाली होती. ही गाडी मंगळवारी बडनेरामार्गे मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात दाखल झाली. त्यानंतर सायंकाळी नागपूरमार्गे पुढे रवाना झाली होती. ट्रँकर खाली उतरविणे व चढविण्यासाठी रॅम्प तयार करण्यात आले होते. टँकर भरून घेतल्यानंतर ही गाडी महाराष्ट्राच्या दिशेने रवाना झाली. विशाखापट्टनमहून निघालेली ऑक्सिजन एक्स्प्रेस शुक्रवारी (२३ एप्रिल) सायंकाळी ७ च्या सुमारास नागपूर रेल्वेस्थानकावर दाखल झाली. या एक्स्प्रेसमधून ऑक्सिजनचे तीन टँकर नागपुरात उतरविण्यात आले. या तीन टँकरपैकी एक टँकर ट्रक्सवर चढवून तो ग्रीन कॉरिडॉर पद्धतीने अमरावतीला नेण्यात येणार आहे. दरम्यान, गुरुवारी विशाखापट्टनमहून निघालेली ही रेल्वे नागपूर रेल्वेस्थानकावरील फलाट क्र. ८ वर आली होती.

Leave a Reply