चंद्रपूर : २२ एप्रिल – चिंचपल्ली वनपरिक्षेत्रातील केळझर उपक्षेत्राच्या दाबगावजवळील शेतातील पाण्याने भरलेल्या विहिरीत अंदाजे सहा-सात महिन्यांचा पट्टेदार वाघाचा नर छावा पडला. त्यास वनविभागाने सुखरूप बाहेर काढले आहे. प्राप्त माहितीच्या आधारे वनविभागाचे अधिकारी- कर्मचारी, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे जलद बचाव पथक घटनास्थळावर पोहचून पाहणी केली.
वरिष्ठ वन अधिकारी तसेच पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनाखाली बचाव दालने क्याच पोलच्या सहायान या वाघिनीच्या पिल्लूला सुखरूप विहिरीबाहेर काढून पिंजऱ्यात टाकले. या वाघिणीच्या पिल्लास पुढील उपचार करिता चंद्रपूर येथील तात्पुरत्या ट्रान्झिट सेंटरला नेण्यात आले आहे.