वर्हाडी ठेचा ….

साप आणि नेता ……!

एकदा एका आघाडीच्या नेत्याचा
सापावर पाय पडला
तरीही साप त्याला
मुळीच नाही चावला !

बाजूच्या माणसानं
आश्चर्यानं पुसलं …
“अहो अहो नागोबा
हे असं कसं घडलं !

तुम्ही लगे रहो मुन्नाभाई
तर नाही ना पहिला ?
मग काय झालं तुम्हाला
असं गांधीवादी व्हायला !”

साप म्हणाला —
” हे बघ माणसा,
” एक माणूस दुसर्या माणसाला
भलेही चावू शकतो
पण ,एक साप दुसर्या सापाला
कधीच चावत नसतो !!”

  कवी- अनिल शेंडे

Leave a Reply