फडणवीसांनी नागपुरात उपलब्ध केले ५ ऑक्सिजन टँकर

नागपूर : २२ एप्रिल – नागपूर शहरात कोरोना रुग्णांची स्थिती बघता, मदतीचा ओघ सुरू झाला असून शहरातील रुग्णांची गरज म्हणून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५ ऑक्सीजन टँकर उपलब्ध करुन दिले असून आगामी १० दिवसात ५ ऑक्सिजन टँकर उपलब्ध होणार असून त्यासाठी समन्वय देखील करून दिला आहे.
यासाठी आज देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांची भेट घेतली. ऑक्सीजनचे हे टँकर एक दिवसाआड नागपुरात पोहोचणार आहे. त्यासाठी फडणवीस यांनी जयस्वाल्स निको लि. या इंटिग्रेटेड स्टील प्लांट, सिलतरा, रायपूर येथे संपर्क साधून ही व्यवस्था केली आहे.
या टँकरच्या वाहतुकीसाठी ‘जेएसडब्ल्यू‘ मदत करणार आहे. यासंदर्भात जयस्वाल्स निको लि. चे कंपनीचे अध्यक्ष बसंतलाल शॉ आणि सह प्रबंध संचालक रमेश जयस्वाल, तसेच जेएसडब्ल्यूचे संदीप गोखले यांच्याशी चर्चा केली व त्यांनी केलेल्या सहकार्याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही कंपन्यांच्या पदाधिकार्यांचे आभार मानले आहेत. आज नागपूरकरांसाठी ही अतिशय मोलाची मदत आहे. प्रशासनाने आता त्वरेने कारवाई करावी असे आवाहनही फडणवीस यांनी यावेळी केले.

Leave a Reply