पूर्व विदर्भात कोरोनाचा कहर सुरूच, उपराजधानीत ७३३४ बाधित तर ११० रुग्णांचा मृत्यू

नागपूर : २२ एप्रिल – नागपूरसह पूर्व विदर्भात कोरोनाचा प्रकोप सतत वाढताना दिसत आहे. रुग्णसंख्या आणि रुग्णांचे रोज होणारे मृत्यू यातील काहीच कमी होण्याची चिन्हे दिसत नाही. नागपूर शहरात रोज हजारोच्या संख्येने बाधित रुग्ण सापडत आहेत तर शेकडो रुग्णांचा मृत्यू होत आहे. नागपूर पाठोपाठ भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यातही रुग्णसंख्या आणि रोजचे होणारे मृत्यू वाढतच असल्याची चिन्हे आहे. नागपूर शहरात आज तब्बल ७३३४ नवीन बाधित रुग्ण आढळून आले तर ११० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नागपूर पाठोपाठ भंडारा जिल्ह्यात १५६८ बाधित तर १४ रुग्णांचा मृत्यू तर चंद्रपूर जिल्ह्यात ९२२ बाधित तर २८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्य शासनाने लावलेल्या कडक निर्बंधांनंतरही कोरोना रुग्णवाढीत काहीच फरक पडलेला दिसत नाही. नागपूर शहरात गेल्या २४ तासात ७३३४ नवीन बाधित रुग्ण आढळून आले असून एकूण रुग्णसंख्या ३५०९३३ वर पोहोचली आहे. तर आज ११० रुग्णांच्या झालेल्या मृत्यूंमुळे जिल्ह्यातील एकूण मृतकांचा आकडा ६६८५ वर पोहोचले आहेत.
नागपूर शहरात आज एकूण २१५८५ चाचण्या घेण्यात आल्या आहेत. गेल्या २४ तासात ६३१४ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून एकूण कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या २७१७७१ वर पोहोचली आहे.

Leave a Reply