गडचिरोली : २२ एप्रिल – नक्षलवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील एका पोलीस स्टेशनवर हल्ला केलेला आहे. छत्तीसगडला लागून असलेल्या सीमावर्ती भागात असलेल्या पोलीस स्टेशनवर ग्रॅनाईट हल्ला करण्यातआला. मात्र, ग्रॅनाईटचा स्फोट न झाल्यानं मोठा अनर्थ टळला. काही दिवसांपूर्वी छत्तीसगडमध्ये सीआरपीएफच्या जवानांवर नक्षलवाद्यांनी हल्ला केला होता. त्या हल्ल्यात २२ जवान शहीद झाले होते.
नक्षलवाद्यांनी त्यांचा मोर्चा महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्याकडे वळवल्याचं चित्र आहे. नक्षलवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील गट्टा पोलीस स्टेशनवर नक्षलवाद्यांनी ग्रॅनाईट टाकला. या ग्रॅनाईट स्फोट झालेला नाही. यामुळे एक मोठा अनर्थ टळला. परंतु, नक्षलवाद्यांनी पोलीस स्टेशन उडवण्याचा प्रयत्न करणं ही मोठी घटना मानली जात आहे. पोलीस स्टेशन पर्यंत नक्षलवादी पोहोचल्यानं पोलिसांना सतर्क व्हावं लागणार आहे.
नक्षलवादी या पोलीस स्टेशन परिसरात कसे आणि कुठून आले? गट्टा पोलीस स्टेशन परिसरात ग्रॅनाईट टाकलेला नक्षल दलम कोणता? याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून सर्च ऑपरेशन राबवण्यात येत आहे. अधिक माहिती घेण्यासाठी पोलिसांची पथक शोध आपरेशन राबवित आहेत.