पिकअप व्हॅन आणि ट्रॅव्हल्सच्या अपघातात आठ गायी आणि एका व्यक्तीचा मृत्यू

अमरावती : २१ एप्रिल – अवैधरित्या जनावरांना कोंबून नेणाऱ्या पीकअप व्हॅनला ट्रॅव्हल्सने दिलेल्या जबर धडकेत पिकअप व्हॅनचा क्लिनर जागीच ठार झाला तर वाहनांमध्ये असलेल्या आठ गायींसह दोन गोवंशाचा अपघातात दुदैर्वी मृत्यू झाल्याची घटना सकाळी साडे सहा वाजताच्या दरम्यान रहाटगाव रिंगरोड नजीक घडली. घटनेत पिकअप व्हॅनचा चालक देखील गंभीर जखमी असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.नासिर खान अकबर खान असे अपघातात ठार झालेल्या क्लिनर चे नाव आहे तर संगम मोहोड हा चालक गंभीर जखमी आहे.पहाटे साडे सहा वाजताच्या दरम्यान पिकअप व्हॅन क्र. एम एच २७,बी एक्स ४८0६ अवैधरित्या जनावरे घेऊन अमरावती कडे भरधाव जात असताना व्हॅन च्या चालकाने कोणताही विचार न करता रिंगरोड च्या दिशेने वाहन वळविले त्यामुळे विरुद्ध दिशेने येणार्या ट्रॅव्हल्स क्र. एम एच २0,इ एल ८00 ने पीकअप व्हॅन ला जोरदार धडक दिली. दोन्ही वाहने भरधाव असल्याने ट्रॅव्हल्स ने दूरपयर्ंत पिकअप व्हॅन ला घासत नेले. यामध्ये क्लिनर नासिर खान अकबर खान हा जागीच ठार झाला तर चालक संगम मोहोड गंभीर जखमी झाला. शिवाय वाहनांमध्ये कोंबून नेण्यात येत असलेल्या ८ गायी व २ गोवंशचा देखील अपघातात मृत्यू झाला.घटनेची माहिती नांदगांव पेठ पोलिसांना कळताच तातडीने पोलीस ताफा घटनास्थळी पोहचला. जखमी चालकाला तसेच मृतकाला रुग्णवाहिकेच्या मदतीने जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहचविले तर अपघातात मृत जनावरांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Leave a Reply