विवाहितेवर सलग तीन महिने लैंगिक अत्याचार करणाऱ्यावर गुन्हा दाखल

अमरावती : २० एप्रिल – चार महिन्यांपूर्वी माहेरी आलेल्या विवाहितेला पुन्हा प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर सलग तीन महिने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. अमरावतीतील गोयंका नगर परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी दत्तापूर पोलिसांनी आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विवाहित तरुणी ही चार महिन्यांपूर्वी माहेरी आली होती. तिचे नऊ वर्षांपूर्वी शेजारी राहणाऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. तरुणाने तिला पुन्हा आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिच्यावर सलग तीन महिने लैंगिक अत्याचार केले. यासंबधीची तक्रार पीडितेने पोलिसांत दिली. त्यानुसार, दत्तापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोयंका नगर येथे ही घटना घडली आहे. चार महिन्यांपूर्वीच पीडिता ही आपल्या माहेरी आली होती. तिच्या पालकांच्या घराशेजारी राहणाऱ्या तरुणाशी नऊ वर्षांपूर्वी प्रेमसंबंध होते. ती माहेरी आल्यानंतर तरुणाने पुन्हा त्या विवाहितेला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. सलग तीन महिने विवाहित तरुणीसोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले. लैंगिक शोषण केल्याची तक्रार तिने दत्तापूर पोलिसांत दिली. पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला. आरोपीला अटक करण्यासाठी पथके रवाना केली आहेत. या प्रकरणाचा तपास दत्तापूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार ब्रह्मदेव शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सोनवणे करीत आहेत.

Leave a Reply