राजकारण ही कोरोनापेक्षा भयानक कीड देशाला पोखरते आहे – अभिनेत्री तेजस्विनी पंडित

मुंबई : २० एप्रिल – देशभरात कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. मात्र, यावेळेस कोरोनाची ही दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा देखील अधिक विध्वंसक असल्याचे सिद्ध झाले आहे. दररोज लाखो लोक या विषाणूच्या विळख्यात अडकत आहेत, तर कित्येक हजार लोक या विषाणूमुळे बळी पडत आहेत. देशात एकीकडे ही विदारक परिस्थिती असताना दुसरीकडे राजकारणही तापलेलं पाहायला मिळतंय. सामान्य माणूसच नव्हे तर, आता कलाकार देखील या राजकारणावर संताप व्यक्त करू लागले आहेत. सोशल मीडियावर सक्रिय असणारी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने देखील आपला संताप व्यक्त केला आहे
कोरोना काळात आरोग्य सेवेसोबतच देशावर आर्थिक समस्येचे मोठे संकट देखील कोसळले आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीतही राजकीय नेते केवळ राजकारण करण्यात व्यस्त असलेले दिसतायत. त्यामुळे अशा नेत्यांवर आणि त्यांच्या राजकारणावर अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने संताप व्यक्त करत, राजकारण ही कोरोनापेक्षा भयानक कीड देशाला पोखरते आहे, अशी टीका देखील केली आहे.
सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या तेजस्विनीने इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे सद्य परिस्थितीवर भाष्य केले आहे. यात तिने केवळ देशातच नव्हे, तर जगभरात सुरु असलेल्या राजकारणावर सडकून टीका केली. या स्टोरी पोस्टमध्ये तेजस्विनी लिहिते, ‘सगळ्यात मोठी “कीड” जर आपल्या देशाला, आपल्याच नाही, तर सगळ्या जगाला लागली आहे, ती आहे “राजकारण”… “ही कीड” covidपेक्षा भयाण, घातक आणि वर्षानुवर्षे आपल्याला पोखरत जाणारी आहे. “या कीड”पासून बचाव करता आला तर बघा!!.. अवघड आहे सगळंच…काळजी घ्या”. सध्या तिची ही स्टोरी आणि तिचा हा बेधडक अंदाज चांगलाच चर्चेत आला आहे

Leave a Reply