कोविड रुग्णालयातून पळून जात रुग्णाने केली आत्महत्या

वर्धा : २० एप्रिल – आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या कोवीड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या एका कोरोनाबाधित रुग्णाने रुग्णालयामधून पलायन करून दुसऱ्याच्या विहिरीत उडी घेवुन आत्महत्या केली. विजय उत्तमराव खोडे (४0 वर्ष) असे आत्महत्या करणाऱ्या कोरोना बाधीत रुग्णाचे नाव असुन तो आष्टी तालुक्यातील बोरगाव (टुमणी) येथील रहवासी आहे. आष्टी तालुक्याच्या बोरगाव (टुमणी) येथील विजय उत्तमराव खोडे यांच्यावर आष्टी येथील प्राथमीक रुग्णालयात उपचार सुरू होता. यादरम्यान त्याची कोरोना तपासणी करण्यात आली. यात कोरोना सकारात्मक असल्याचा अहवाल आला. परिणामी त्याला येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयाच्या कोविड केंद्रामध्ये बुधवारी (ता.१४) दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याच्या प्रकृतीमध्ये दिवसेंदिवस सुधारणा होत चालली होती. अशातच त्याने शनिवारी (ता.१७) रात्री बेमालुमपणे कोविड केंद्रामधुन पलायन केले. याची पोलीसात तक्रार सुध्दा केली आणी शोध घेण्यात आला. मात्र तो कुठेच आढळला नाही. त्याचा भाऊ संजय खोडे याने भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधण्याचा सुध्दा प्रयत्न केला. रिंगटोन जात होती. मात्र ,संपर्क होत नव्हता. शेवटी त्याचा नंबर ट्रॅकवर टाकला व भ्रमणध्वनीचा लोकेशन मिळाल. त्याप्रमाणे शोध घेतला असता.
मॉडेल हायस्कूलच्या लगतच्या जगदीश चांडक यांच्या शेतामधील विहीरीत पाण्यावर तरंगताना दिसुन आला. स्मशानभूमीत नातेवाईकांच्या उपस्थितीत नगर परिषदेच्या भरारी पथकातील सुनील आरेकर,साकेत राऊत, किशोर नेवारे, करण चावरे, अरुण पंड्या यांनी अंत्यसंस्कार केले.

Leave a Reply