कोरोनाचा प्रकोप सुरूच, ६८९० नवीन बाधित तर ९१ रुग्णांचा मृत्यू

नागपूर : २० एप्रिल – नागपूर शहरातील कोरोनास्थिती ही देशातील इतर शहरांपेक्षा वाईट होत चालली आहे. संपूर्ण देशाचे लक्ष सध्या नागपुरातील कोरोना रुग्णांवर आणि क्जओरॉन रुग्णांच्या होणाऱ्या मृत्यूंवर केंद्रित झाले आहे. शहरातील जनतेला बहुतेक रोज नवे धक्के पचवण्याची सवय झाली आहे कारण, शहरातील नागरिकांच्या वर्तवणुकीत काहीच फरक झालेला दिसत नाही. राज्य सरकार रोज नवनवे नियम लागू करून परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करीत आहे निर्बंध अधिक कडक करते आहे पण जनजागृतीशिवाय काहीही साध्य होणार नाही अशी परिस्थिती दिसून येत आहे. नागपूर शहरात आज ६८९० नवीन बाधित रुग्णांची नोंद झाली असून ९१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
नागपूर शहरात आज ६८९० बाधित रुग्णांची नोंद झाली असून त्यात २००५ ग्रामीण भागातील ४८७८ शहरातील तर ७ इतर जिल्ह्यातील रुग्ण आहेत. शहरातील एकूण बाधितांची संख्या ३३६३६० वर पोहोचली आहे. तर शहरात आज ९१ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून त्यात ३४ रुग्ण ग्रामीण भागातील ५० शहरातील तर ७ रुग्ण इतर जिल्ह्यातील आहेत. शहरातील मृत्युसंख्या ६४७७ वर पोहोचली आहे.
आज शहरात २६०८० चाचण्या घेण्यात आल्या असून त्यात १६११२ शहरात तर ९९६८ चाचण्या ग्रामीण भागात घेण्यात आल्या आहेत. गेल्या २४ तासात ५५०४ बाधित रुग्ण बरे झाले असून त्यात २०४८ ग्रामीण भागातील तर ३४५६ शहरातील आहेत. एकूण कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या २५८१९१ वर पोहोचली आहे तर कोरोना बरे होण्याचे प्रमाण ७६.८० टक्क्यांवर आले आहे. सध्या शहरात ७१६९२ ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण असून त्यात २८०३५ ग्रामीण भागातील तर ४३६५७ शहरातील रुग्ण आहेत.

Leave a Reply