नागपूर : १९ एप्रिल – कमी वयात आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप उमटविणारी शहरातील आंतरराष्ट्रीय महिला मुष्टियोद्धा व भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अल्फिया पठाणने वर्ल्ड युथ बॉक्सिंग चॅम्पियनशिपमधील सलामी लढतीत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. यात तिनं प्रतिस्पर्धीला नमवून उपांत्य फेरीत धडक दिली. पहिल्यांदाच वर्ल्ड युथ बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये खेळत अल्फियाने ही कामगिरी केली हे विशेष.
केवळ १८ वर्ष वय असणाऱ्या अल्फिया पठाण स्पर्धेत ८१ किलोपेक्षा अधिक वजनगटात भारताचे प्रतिनिधित्व करीत आहे. रविवारी दुपारच्या सत्रात अल्फियाची लढत हंगेरीच्या रोका होफमनविरुद्ध झाली. दोन्ही खेळाडू विजयासाठीच खेळल्या. परंतु, आक्रमक पद्धतीने खेळणाèया अल्फियाने पहिल्या व दुसèया राउंडमध्ये वर्चस्व प्रस्थापित केले. तिसèया राऊंडमध्ये प्रतिस्पर्धी अल्फियाच्या आक्रमक खेळापुढे टिकलीच नाही. त्यामुळे राऊंड संपण्यापूर्वीच पंचांनी अल्फियाला विजयी घोषित केले. अल्फियाने हंगेरीच्या रोका होफमन ५-० असा पराभवाचा धक्का देत दिमाखात उपांत्य फेरीत धडक दिली आहे. उपांत्य सामन्यात अल्फिया पठाणची लढत मंगळवारी दुपारी पोलंडच्या ऑलिव्हिया तोबोरेकविरुद्ध होणार आहे.
वल्र्ड युथ बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीत प्रवेश करणाèया अल्फिया आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक भास्कर भट यांच्या मार्गदर्शनाखाली रोहतक येथील साईच्या राष्ट्रीय मुष्टियुद्ध अकादमीत सराव करते. अल्फियाने दोन महिन्यांपूर्वी बुडवा (माँटेनिग्रो) येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले होते. ज्युनिअर गटात देशात अव्वल स्थानावर राहिलेल्या अल्फियाने आतापर्यंत देशविदेशातील अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके आपल्या नावे केली आहेत. सद्यस्थितीत अल्फिया फार्ममध्ये असून पहिल्यांदाच वल्र्ड युथ बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये ती उत्कृष्ट कामगिरी करीत भारताला पदक मिळवून देईल, अशी अपेक्षा आता व्यक्त केली जात आहे.