विदर्भात तात्काळ रेमडेसिवीर इंजेक्शनची पूर्तता करा : चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर : १८ एप्रिल –आज नागपूरमध्ये आणि विदर्भात रेमडेसिवीर इंजेक्शन ची नितान्त गरज आहे सर्व रुग्णालयातील रेमडेसिवीर इंजेक्शनचा स्टॉक संपला आहे इंजेक्शन अभावी रुग्ण मरत आहेत तरी पण नागपूर आणि विदर्भाला इंजेक्शन मिळत नाहीत तर दुसऱ्या जिल्याला मिळत आहेत असा भेदभाव विदर्भासीच का ? सर्वांना समान इंजेक्शन द्यावे अशी मागणी पत्रपरिषदेच्या माध्यमातून भाजप चे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे मुंबई , ठाणे जिल्ह्यात एका रुग्णाला दोन दोन दा इंजेक्शन देत आहात मग नागपूर आणि विदर्भाला का नाही तुम्ही असा भेदभाव का करता पूर्वीच विदर्भात ऑक्सिजन नाही ,बेड उपलब्ध नाहीत आणि तुंम्ही रेमडेसिवीर इंजेक्शन देण्यात भेदभाव करत असाल तर हा भेदभाव कशासाठी आज रेमदेसिवीर इंजेक्शन अभावी रुग्ण मरत आहेत हा आकडा खूप भयंकर असणार आहे. नागपूर आणि विदर्भातील नेत्यांनी सरकारसी चर्चा करून इंजेक्शनचा सामान वाटा मिळवून घ्यावा. केंद्राकडून इंजेक्शन मिळत नाहती तर मग मुंबई ठाणे जिल्ह्यात एका रुग्णाला दोन दोन दा इंजेक्शन का दिले जात आहेत असा प्रसन्न उपस्थित करीत पत्र पपरिषदेच्या माध्यमातून नागपूर आणि विदर्भाला इंजेक्शन देण्याची मागणी राज्य सरकारला केली आहे

Leave a Reply