बिबट्याच्या हल्ल्यात गोऱ्हा ठार


यवतमाळ : १८ एप्रिल – फुलसावंगी येथील शेतकरी प्रमोद कृष्णापुरे यांच्या शेतातील गोर्हा (वय 1 वर्ष) बिबट्याने हल्ला करून ठार मारले. रात्री ही घटना घडली. शनिवारी सकाळी प्रमोद कृष्णापुरे यांनी नेहमीप्रमाणे आपली गुरे, ढोरे शेतात चारापाणी करून सकाळी 7:30 ला बांधली व ते घरी आले. त्यानंतर पुन्हा ते 9 वाजता शेतात गेले तर बिबट्याने येऊन त्यांच्या गोर्ह्यावर हल्ला केलेला दिसला. त्यामध्ये गोर्हा ठार झाला. यात शेतकर्याचे मोठे नुकसान झाले आहे.
विशेष म्हणजे हे शेत गावापासून हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे फुलसावंगी परिसरातील शेतकर्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी येथील भिकू नाईक नगर परिसरातील तरुणांनी अस्वलास अनेकवेळा बघितले आहे. तसेच 4 एप्रिलला येथील मुस्लिम कब‘स्थान लगत असलेल्या फाटकाजवळ शेख मुसा अब्दुल रहेमान यांच्या वगारीवर बिबट्याने हल्ला केला होता. तर 3 एप्रिलला पांडुरंग गजलवाड यांच्या शेतातील गोठ्यावरीन कालवड फस्त केली होती. अशा घटना सतत घडत असल्यामुळे शेतकर्यांमध्ये दहशत पसरली आहे.
शेतकरी प्रमोद कृष्णापुरे यांनी शासनाकडून नुकसानभरपाई मिळावी म्हणून वनपरिक्षेत्र अधिकारी महागाव यांच्याकडे अर्ज केला आहे. या अर्जाची दखल घेत वनरक्षक मोतेवार यांनी पंचनामा केला.

Leave a Reply