गडचिरोली : १८ एप्रिल – गडचिरोली शहरातील मृत बिबटाचे कातडी विक्री करणाऱ्या नागरिकांच्या घरी आरमोरी वनपरिक्षेत्र अधिकार्यांनी धाड टाकून बिबट्याचे कातडी, नखे जप्त केली. याप्रकरणी पाच आरोपींना अटक केली. यशवंत सोनबाजी निखारे, सुभाष पंढरी धकतो, विश्राम शंकर रामटेके, सुदाम पांडुरंग कांबळे, ईश्वर विस्तारी सोरते सर्व रा. आरमोरी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत.
आरमोरी परिक्षेत्रातील आरमोरी शहरात मृत बिबट वन्यप्राण्याचे कातडे विक्री करण्याचे उद्देशाने साठवून ठेवल्याची गुप्त माहिती आरमोरी वनपरिक्षेत्र अधिकार्यांना मिळली. यावरून वनविभागाच्या अधिकार्यांनी तोतया ग्राहक तयार करून विक्रीत सहभागी असलेल्या यशवंत सोनबाजी निखारे, सुभाष पंढरी धकतो, विर्शाम शंकर रामटेके, सुदाम पांडुरंग कांबळे, ईश्वर विस्तारी यांच्याकउून मृत बिबटाचे कातडे, नखे हस्त केली. सदर आरोपींना न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी न्यायालय आरमोरी येथे हजर केले असता १९ एप्रिलपर्यंत वनकोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपी असल्याची शक्यता असल्याने वनविभागाच्यावतीने चौकशी आहे.
सदर कारवाई वडसा वनविभागाचे उपवनसंरक्षक निरंजन विवरेकर, सहायक वनसंरक्षक मनोज चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली आरमोरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एम. डोंगरवार, वडसाचे आर. बी. इनवते, आरमोरीचे क्षेत्र सहायक आर. पी. कुंभारे, वनरक्षक एस. पी. तिजारे, बी. एन. शेंडे, एन. एम. तुमपल्लीवार, के. एस. गिन्नलवार, आर. बी. सहारे, पी. एच. करकाडे, श्रीकांत सेलोटे यांच्यासह आरमोरी परिक्षेत्रातील कर्मचार्यांनी केली. पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एम. डोंगरवार हे करीत आहेत.