पार्सलच्या नावाने तरुणाची ५० हजाराची ऑनलाइन फसवणूक


नागपूर : १८ एप्रिल– राकेश जवाहरला डडूरे वय २८ वर्षे यांनी एका वस्तूची ऑर्डर केली होती, पार्सल न आल्यामुळे त्यांनी गूगल मधून मारुती कुरिअर कंपनीचा मोबाईल नंबर शोधला असता त्यावर काल केल्यानंतर त्याला एनी डेस्क अप्स इंस्टाल करायला सांगण्यात आले . ओटीपी मागून त्याची पन्नास हजार रुपयांनी फसवणूक झाली असल्याचे कळले. याची तक्रार त्यांनी लकडगंज येथील सायबर पोलीस स्टेशनला केली
अशा संवेदनशील व गंभीर गुन्ह्यात सायबर पोलिसांनी आंतरराष्ट्रीय गुन्हेगार उदा नायजेरियन टोळी आदी टोळींना अटक करून त्यांच्याकडून गुन्हे उघडकीस आणले कुणालाही आपली व्यक्तिगत माहिती ओटीपी नंबर देऊ नका असे सायबर पोलीस विभागाकडून सांगण्यात येते . सायबर गुन्हे कसे घडतात यावर आता पर्यंत केंद्र व राज्य शासनाच्या वतीने शंभर पेक्षा जास्त वेबिनार घेण्यात आले. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेशकुमार अप्पर पोलीस आयुक्त सुनील फुलारी यांच्या आदेशानुसार पोलीस उप आयुक्त विवेक मसाला यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेल चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ अशोक बागुल यांनी केली

Leave a Reply