वर्धा : १८ एप्रिल – जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण कक्ष वर्धा यांच्या माध्यमातून अल्लीपूर येथे बाल विवाहाबाबत कारवाई करण्यात आली. श्रीराम मुंदडा तहसीलदार,गटविकास अधीकारी संघमित्रा गोल्हे, एकात्मीक बाल विकास प्रकल्प अधीकारी अमोल चिरूटकर यांच्या आदेशानुसार जिल्हा बाल संरक्षण कक्षाव्दारे भेट दिली असता दोन्ही मुली अल्पवयीन असल्याचे दिसून आले.
पोलिस नीरीक्षक शैलेश शेळके व अल्लीपुर पोलिस स्टेशन यांच्या सहकार्याने मुलीचे आई वडील व नातेवाईकांना समज देण्यात आली व मार्गदर्शन केले, सदर बालविवाह होत असल्याची माहिती गाव बाल संरक्षण समितीच्या माध्यमातून मिळाली, सदर मुलंीचे वय १७ वर्षे ८ महिने दुसरी १७ वर्षे असल्याचे निदर्शनास आले. बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम २00६ अल्पवयीन मुलीचे बालविवाह होणार नाही याबाबत सूचना देण्यात आल्या तसेच पालकांकडून जबाब नामा लिहून घेऊन, बाल संरक्षण समिती अध्यक्ष व सदस्य यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन ठराव घेण्यात आला. तसेच अल्पवयीन दोन्ही बालिकेला बालकल्याण समितीसमोर उपस्थित राहण्याबाबत सूचना देण्यात आल्या. त्यावेळी अल्लीपुर गावाचे सरपंच नीतीन चंदनखेडे, उपसरपंच विजय कवडे, ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय दिवटे, उज्ज्वला गुळघाने पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका मनीषा सुरकार, गाव बाल संरक्षण समिती सदस्य सतीश काळे, अल्लीपुर पोलीस स्टेशन कडून जमादार राजेश्वर शिरभाते , ममता वैतागे, तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.