सुलेखा कुंभारे यांच्या विनंतीने डाॅ प्रज्ञा मेश्राम यांचे चिकित्सालय सुरू


नागपूर : १७ एप्रिल -उत्तर नागपूर येथील डॉ प्रज्ञा मेश्राम यांच्या आयुर्वेदिक काढय़ामुळे मोठय़ा प्रमाणात कोरोना संक्रमित झालेले रुग्ण कोरोनामुक्त होत असताना महानगरपालिका यांनी कोणत्याही प्रकारची पूर्व सुचना न देता अचानकपणे डॉ. प्रज्ञा मेश्राम यांचे चिकित्सालय बंद करण्याचे आदेश १४ एप्रिल रोजी दिले होते. त्यामुळे हजारोंच्या संख्येने लाभ घेणारे कोविड संक्रमित रुग्ण या औषधीपासून वंचित झाले होते.. डॉ प्रज्ञा मेश्राम यांच्यावर अन्याय झाल्याचे लक्षात येताच माजी राज्यमंत्री अँड सुलेखा कुंभारे यांनी पुढाकार घेऊन महापौर दयाशंकर तिवारी यांची सिव्हील लाईन येथील कार्यालयात भेट घेतली व डॉण् प्रज्ञा मेर्शाम यांच्या आयुर्वेदिक औषधीमुळे पन्नास हजारांहून अधिक कोविड रुग्ण बरे झाले असल्यामुळे हे आयुर्वेदिक चिकित्सालय परत सुरू करण्याची परवानगी द्यावी अशी महापौरांना विनंती होती. यानंतर आयुर्वेदिक चिकित्सालय त्वरित सुरू करण्याची परवानगीसह सहकार्य करण्याचे महापौरांनी आश्‍वासन दिल्याची माहिती अँड सुरेखा कुंभारे यांनी दिली.
चर्चेदरम्यान वर्तमान परिस्थितीत मेडिकलए मेयो एम्ससारख्या शासकीय रुग्णालय तसेच खासगी रुग्णालयातसुद्धा बेड उपलब्ध नाहीत व वैक्सीनचासुद्धा पुरवठय़ाचे प्रमाण कमी झालेले आहे. अशापरिस्थितीत जिल्ह्यात दररोज पाच हजारांवरून लोकं संक्रमित होत आहेत. दररोज पन्नासहून अधिक लोकं या कोरोनामुळे मृत्युमुखी पडत आहेतण. हे सर्व लक्षात घेता अतिशय गरीब लोकांना १५0 रुपयांमध्ये डॉ. प्रज्ञा मेर्शाम यांच्या आयुर्वेदिक काढयाने कोविड रूग्ण बरे होत असतील तर त्यांचे आयुर्वेदिक चिकित्सालय त्वरित सुरू करण्याची परवानगीसह डॉण् प्रज्ञा मेश्राम यांना महानगर पालिकेनी पूर्ण सहकार्य व संरक्षण दिले पाहिजे असे मत महापौर यांच्याकडे अँड सुलेखा कुंभारे यांनी व्यक्त केले होते. यावरून महापौर दयाशंकर तिवारी यांनी आयुर्वेदिक चिकित्सालय पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली डॉ प्रज्ञा मेश्राम यांना सहकार्य व संरक्षण देण्यात येईल असे आश्‍वासन दिल्याची माहिती अँड कुंभारे यांनी दिली

Leave a Reply