सुप्रसिध्द शिवकथाकार सुमंत टेकाडे यांचे कोरोनाने निधन

नागपूर : १७ एप्रिल : नागपुरातील सुप्रसिद्ध शिव अभ्यासक वक्तेए लेखक व्यवस्थापन तज्ञ व्याख्याते व अनेक व्यासपिठावर आपले प्रभुत्व गाजवणारे सुमंत टेकाडे यांचे कोरोनाने आज पहाटे निधन झाले ४० वर्षांचे होते सुमंत टेकाडे विविध कंपन्यांमध्ये शिवकालीन व्यवस्थापन पद्धतीवर व्याख्यान द्यायचे ते तरुण भारतासाठी स्तंभ लेखन करायचे आजच्या व्यवस्थापन युगात तंतोतंत खरे उतरणारे शिवरायांचे आदर्श अंतिशय अभ्यासपूर्णरितीने मांडणारे युवकांमधे लोकप्रिय वक्ते आणि लोभस व्यक्तीत्व लाभलेले डॉक्टर सुमंत यांनी बंगलोरमधून व्यवस्थापन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले होते ते काही दिवस विप्रोच्या मानव संसाधन विभागात कार्यरत होते. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघा विषयीचे प्रेम स्वस्थ बसु देत नव्हते नोकरी सोडून ते प्रचारक गेले व नंतर व्यवस्थापन विषयात आचार्य पदवी संपादंन करुन ते एका महाविद्यालयात काही काळ विभागप्रमुख होते-

तिही नौकरी सोडून त्यानी शिवराय व त्यांचे व्यवस्थापन कौशल्य व व्यवस्थापनाशी निगडीत इतर विषय यावर भाषणे देऊन समाजप्रबोधन करणे हे व्रत अंगीकारले त्यांचे राज्य आणि परराज्यातिल कार्यक्रम लक्ष वेधून घेत होते. त्यांचे आजोबा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भाष्यकार मा गो वैद्य आणि शिवकथाकार विजयराव देशमुख यांचे त्याना मोलाचे मार्गदरर्शन लाभले लवकरच त्यानी लिहीलेल्या पुस्तकाचे व लेखसंग्रहा चे प्रकाशन करण्याचा त्यांचा मानस होता. त्यातच काळाने घाव घातला व एका समाजभीमूख व्यक्तीत्वचा अंत झाला ते नवयुग विद्यालयाचे माजी शिक्षक वा धरमपेठ शिक्षण संस्थेचे माजी पदाधिकारी दत्ता टेकाडे यांचे सुपुत्र होतेण् त्यांचे मागे पत्नी माधवीए दोन मुले आणि आई व बराच मोठा आप्तपरीवार आहे.

Leave a Reply