रेमडेसिव्हीर, ऑक्सिजन वाटपात विदर्भावर अन्याय – चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप


नागपूर : १७ एप्रिल : भाजप नेते माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रेमडेसिव्हीर, ऑक्सिजन वाटपात विदर्भावर अन्याय होत असल्याचा आरोप केला आहेत महाराष्ट्र सरकारमधील हेवीवेट मंत्री सरकारी अधिकाऱ्यांवर दबाव बनवून त्यांच्या जिल्ह्यासाठी दुप्पट ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हीर नेत आहेत मराठवाड्यातील एका मंत्र्यांनं १० हजार रेमडेसिव्हीर स्टॉक केले. पश्चिम महाराष्ट्रातील मंत्र्यानं 25 हजार इंजेक्शन नेले ठाण्यात एका रुग्णामागं दोन इंजेक्शन आणि नागपूरमध्ये २ रुग्णांमागं एक इंजेक्शन मिळत असल्याचा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. राज्यातील वजनदार मंत्री आपल्या जिल्ह्यासाठी मोठ्या प्रमाणात इंजेक्शन घेत आहेत. असा आरोप देखील त्यांनी केला. नागपूरमधील मंत्री जिल्ह्याला रेमडेसिव्हीर मिळवून देण्यात कमी पडत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाणे जिल्ह्यात रुग्णामागे रेमडेसिव्हीरची २ इंजेक्शन मिळत आहे तर नागपुरात मात्र २ रुग्णामागे एक एवढा साठा दिला जात आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भात ठाणे आणि नागपूर जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्राचा संदर्भ देत आरोप केला ऑक्सिजन संदर्भात सुद्धा तीच परिस्थिती आहे नागपुरातील मंत्री आपल्या जिल्ह्याला रेमडेसिव्हर मिळवून देण्या साठी कमी पडत आहेत त्यामुळे ही परिस्थिती उत्पन्न झाली असा आरोप त्यांनी केला आहे तर पालकमंत्री नितीन राऊत यांना याविषयी पत्र लिहिल्याची माहिती देखील त्यांनी दिली
अनेक जिल्ह्यातील मोठे नेते आपलं वजन वापरुन आपल्या जिल्ह्याला इंजेक्शन मिळवून घेत आहेत गोंदियामध्ये ऑक्सिजन नसल्यामुळे रुग्णांचा जीव गेला याकडे लक्ष देण्याची गरज आहे. विदर्भात मोठ्या प्रमाणात रुग्ण असताना विदर्भातील नेते आपलं वजन का वापरात नाही असा सवाल भाजपचे महासचिव चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला

Leave a Reply