भय इथले संपत नाही, नागपूर एकाच दिवसी ७९ मृत्यू ,६९५६ बाधित

नागपूर : १७ एप्रिल – नागपूर शहर पुर्व विदर्भात कोरोनाचा कहर अविरत सुरू असून त्यात दिवसेनदिवस वाढ होताना दिसत आहे. पुर्व विदर्भात वाढती रूग्ण संख्या डोकेदुखी ठरत असताना सध्या मृत्यूचे तांडव सुरू आहे. पूर्व विदर्भात रूग्णसंख्या कमी जास्त होत असली तरी मृत्यू संख्या ही वाढतच दिसत आहे. नागपूर पाठोपाठ भंडारा, व आता चंद्रपूर या दोन शहरातही कोरोनाने धुमाकुळ घातला आहे. आज पूर्व विदर्भात ७ हजार ८९८ रूग्णांची नवीन बाधित रूग्णांची नोंद झाली असून तब्बल १३५ रूग्णांचा मृत्यु झाला आहे. त्यात नागपूर शहरात विक्रमी ७९ रूग्णांचा मृत्यू झाला असून भंडारा व चंद्रपूर या शहरात २३ मृत्यूची नोंद झाली आहे. तर नागपूर शहरात आज ६ हजार ९५६ बाधित रूग्णांची नोंद झाली आहे.
नागपूर शहरातील कोरोनास्थिती दिवसेंदिवस वाईट होत चालली आहे बहुदा ती अनियंत्रित झाली आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये वाढती रुग्णसंख्या डोकेदुखी ठरत असतानाच आता रोजच्या होणाऱ्या मृत्यूचा कहर सुरु झाला काल ७५ रुग्णांच्या मृत्यूने शहर हादरले असतानाच आज परत ७९ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहेण् तर गेल्या २४ तासात ६९५६ नवीन बाधित रुग्ण आढळले आहेत बाधितांची संख्याही आता ३१५९९९वर पोहचली आहे.
नागपूर शहरातील कोरोनाचे दैनंदिन आकडे आपलेच जुने विक्रम मोडीत काढायला निघाले आहेत शहरात सर्वत्र भीतीचे वातावरण असूनही लोक बेफिकिरीने बाहेर फिरत असल्याचे चित्र आहे रोजचे वाढणारे आकडेही लोकांना आवरण्यात अपयशी ठरत आहेत. त्यामुळे प्रशासनाने विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या लोकांची जागेवरच रॅपीड अअँटीजेन चाचणी करण्याचे निर्देश दिले असून आज पासून ते लागू करण्यात आले आहे. गेल्या २४ तासात नागपूर शहरात तब्बल ६९५६ नवीन बाधित रुग्ण आढळून आले असून बाधितांची संख्या आता ३१५९९९९ वर पोहोचली आहे. आज आलेल्या बाधितांपैकी २४०४७ ग्रामीण भागातीलए ३४५० शहरातील तर ६ रुग्ण इतर जिल्ह्यातील आहेतण् तर शहरात आज ७९ रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यात ३३ रुग्ण ग्रामीण भागातील४० शहरातील तर ६ रुग्ण इतर जिल्ह्यातील आहेत एकूण मृत्युसंख्या ६१८८ वर पोहोचली आहे.
गेल्या २४ तासात नागपूर शहरात२९०५३ चाचण्या घेण्यात आल्या असून त्यात १४४४८ ग्रामीण भागात तर १४६०५ चाचण्या शहरात घेण्यात आल्या आहेत
आज ५00४ रुग्ण कोरोना मुक्त झाले असून कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णांचा आकडा २४३६०३ वर पोहोचला आहेण् तर बरे होण्याचे प्रमाण ७७. 08 टक्के इतके झाले आहेण् शहरात सध्या ६६२०८ ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण असून त्यात २६१०८ ग्रामीण भागातील तर ४० हजार १०० शहरातील रुग्ण आहेत

Leave a Reply