डॉक्टराला शिवीगाळ करुन मारहाण करणार्‍या इसमाला अटक

गोंदिया : १७ एप्रिल -कोरोना चाचणीचा अहवाल मिळण्यास विलंब होत असल्याच्या कारणावरुन आरोग्य कर्मचारी व डॉॅक्टराला शिवीगाळ करुन मारहाण करणार्‍या इसमाला डुग्गीपार पोलिसांनी अटक केली ही घटना १५ एप्रिल रोजी सायंकाळी येथील आदिवसी मुलाचे वस्तीगृहात असलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये घडली.
येथील कोविड केअर सेंटरमध्ये दिनेश श्रीराम मेश्राम ३५ हा इसम सकाळी ११ वाजता कोरोना चाचणी करण्यासाठी आला. दरम्यान चाचणी झाल्यानंतर अहवालाच्या प्रतिक्षेत केंद्रातच बसून राहिला. मात्र सायंकाळ होत असतानाही अहवाल प्राप्त न झाला नाही. त्यामुळे त्याने केंद्रातील कर्मचारी भौतिक देवराज वैद्य याला अहवाल का देत नाही म्हणून शिवीगाळ करुन मारहाण केली. यावेळी कर्तव्यावर असलेले नोडल अधिकारी डॉ. विनोद भुते यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता दिनेश मेश्राम यांनी डॉक्टरांनाही शिवीगाळ करुन मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच डुग्गीपारचे ठाणेदार सचिन वांगडे घटनास्थळ गाळून दिनेश भुतेला ताब्यात घेतले व कलम ३५३, ३३२, ५०४, ५०६ भादवी, सहकलम ४, वैद्यकीय व्यवसाय सेवा संस्था अधिनियम २०१० अन्वये गुन्हा नोंद केला. पुढील तपास ठाणेदार सचिन वांगडे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय विनोद भुरले करीत आहेत.

Leave a Reply