कार पलटून चालकाचा मृत्यू, एक जखमी


भंडारा : १७एप्रिल – शिरसाळा शिवार कन्हाळगाव ते पवनी रोड वर भरधाव इंडिगो कार वळणावर पलटी होवून चालकाचा मृत्यू होवून एक जखमी झाल्याची घटना घडली राहुल उर्फ सोनु राजू डुकसे २५ गोविंदपूर ता ता समुद्पूर जिल्हा वर्धा असे मृतकाचे नाव आहे. तर नीलिमा विकास शर्मा असे जखमीचे नाव आहे.
नीलिमा विकास शर्मा रा. जवाहर वॉर्ड वडसा हि मुलगा दिप शर्मा सोबत कन्हाळगाव येथे विक्की जांभुळे नातेवाईकांकडे पाहुणी म्हणून आली होती- तिच्या मुलाची प्रकृती खराब असल्याने ती राहुल उर्फ सोनु राजू डुकसे यांचे सोबत इंडीगो का एम एच 0६ 0९५९ नी पवनी येथे येवुन चाइल्ड हॉस्पीटल येथे मुलाची ट्रिटमेंट करुन परतीला कन्हाळगाव येथे जात असतांना राहुल उर्फ सोनु राजू डुकसे याने दारु पिऊन वाहन भरधाव चालवित असतांना वळणावर वाहनावरचे नियंत्रण सुटल्याने वाहन पलटले त्यात राहुल उर्फत सोनु राजू डुकसे २५ याचा जागीच मृत्यू झालाण् तर नीलिमा विकास शर्मा हि जखमी झाली पवनी पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Leave a Reply