ऑटोने प्रवास करताना महिलेचे दागिणे लंपास


यवतमाळ : १७ एप्रिल– ऑटोने प्रवास करीत असलेल्या एका महिलेच्या पर्समधील रोख आणि सोन्याचे मंगळसूत्र दोन अनोळखी महिलांनी लंपास केले. ही धक्कादायक घटना शहरातील एलआयसी चौक ते बसस्थानक चौक दरम्यान घडली. या प्रकरणी रेणुका गाडेकर यांनी यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीनुसार शहरालगतच्या मोहा येथील गाडेकर या बुधवारी मोहा येथून यवतमाळकडे येण्यासाठी एका ऑटोतून प्रवास करीत होत्या. यावेळी त्याच ऑटोत दोन अनोळखी महिलादेखील होत्या.
एलआयसी चौक ते बसस्थानक चौक प्रवासादरम्यान त्या दोन अनोळखी महिलांनी रेणुका गाडेकर यांच्या पर्समधील आठ हजारांची रोख, मंगळसूत्र आणि मोबाईल असा मुद्देमाल नजर चुकवून लंपास केला. ही बाब बसस्थानक चौक परिसरात आल्यावर गाडेकर यांच्या लक्षात आली. मात्र तोपर्यंत त्या दोन अनोळखी महिला त्या ठिकाणाहून पसार झाल्या होत्या. या प्रकरणी रेणुका गाडेकर यांच्या तक्रारीवरून यवतमाळ शहर पोलिसांनी त्या दोन अनोळखी महिलांवर विविध कलमान्वये गुन्हे नोंद केले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार प्रदीप शिरस्कर यांच्या मार्गदर्शनात पोलिस करीत आहेत. संचारबंदीमध्येदेखील चोरट्या महिलांची टोळी सक्रिय आहे. एकट्या महिलेला तीन ते चार महिला हेरून बॅगमधून रोखए सोने चोरी करण्याचा प्रयत्न केल्याच्या घटना उजेडात आल्या आहेत. त्यामुळे या महिलांच्या टोळीचा बंदोबस्त करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
0000000000000000000000000

Leave a Reply