अमरावती जिल्हा मध्यवर्ती बॅकेचा पैसा सुरक्षित . माजी अध्यक्ष बबलु देशमुख यांचे स्पष्टीकरण

अमराती: १७ एप्रिल –अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ७०० कोटीचा घोटाळा झाल्याचा आरोप गेल्या काही दिवसांपासुन केले जात आहे. सत्तेत असलेल्या एका राज्यमंत्र्याची त्यांना फूस आहे. परंतु, हे आरोप तथ्यहीन असुन आगामी निवडणुक लक्षात घेता विरोधकांनी माजी संचालकांना बदनाम करण्याचा प्रयत्न चालविलेला आहे. असे स्पष्टीकरण बँकेचे माजी अध्यक्ष बबलू देशमुख यांनी दिले. उलट गेल्या १० वर्षात कधी नव्हे एवढा नफा बँकेला आमच्या संचालक मंडळाच्या कार्यकाळात झाला आहे. ज्या ७०० कोटी संदर्भात आरोप केले जात आहे ते सर्व पैसे बँकेकडे सुरक्षित असुन या ७०० कोटीवर २७३ कोटी ८६ लाख रुपयाचे व्याज बँकेकडे जमा झाले आहे. माजी संचालक मंडळाने गुंतवणुकी संदर्भात धोरण ठरविले होते. त्यानुसार अधिका.यांनी ७०० कोटीची गुंतवणुक केली होती. त्या गुंतवणुकीवर ऑडीट देखील करण्यात आले. परंतु, ऑडीटमध्ये कोणत्याच प्रकारचे ऑब्जेक्शन नाही, तसेच नाबार्डचे देखील याबाबत आब्जेक्शन नाही. काही विरोधकांनी विनाकारण माजी संचालकासह बँकेची देखील बदनामी करण्याचा प्रयत्न चालविल्याने अशा लोकाविरुध्द आम्ही कायदेशिर कारवाई करु असा इशारा माजी अध्यक्ष बबलु देशमुख यांनी दिला.
एकेकाळी डबघाईच्या वाटेवर असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेवर गत १० वर्षापुर्वी सहकार पॅनलच्या नेतृत्वात बँकेचा कारभार आमच्या संचालक मंडळाने हाती घेतला. शेतक.यांच्या हिताचे अनेक निर्णय घेत बँकेमधील ठेवी २२०० कोटी पर्यत नेवून पोहचविल्या. शुभमंगलम योजना, गृह योजना, सोने तारण कर्ज योजना तसेच पगारी कर्मचा.यांना गृह कर्ज, वाहन कर्ज, वैयक्तीक कर्ज, शिक्षकांकरीता ओव्हर ड्राफ्ट, वाहन कर्ज आदी सुविधा देत शेतक.यासह बँकेची देखील आर्थिक दृष्टया प्रगती केलेली आहे हे दरवर्षी होणा.या ऑडीटमध्ये आलेच आहे. त्यामुळे आज विदर्भात अमरावतीच्या सहकारी बँकेचा नाव लौकीक आहे. बँकेचा संपुर्ण व्यवहार हा संगणकीकृत झालेला आहे.
या शिवाय आमच्या संचालक मंडळाने ए.टी.एम सुविधा आदिवासी भागासाठी व दुर्गम भागातील शेतक.यांसाठी मोबाईल व्हॅनची सुविधा अशा कित्येक महत्वाचे निर्णय घेतले आहे. ७०० कोटीचा घोटाळा झाल्याचा जो आरोप विरोधक करीत आहे तो पुर्णतः तथ्यहीन आहे. आमच्या कार्यकाळात बँकेने सन २०१७ ते २०२१ या तिन वर्षात निप्पॉन म्युच्युअल फंडात आर बी आय च्या निमया प्रमाणे ७०० कोटीची गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकी पोटी बँकेला २७३ कोटी ८६ लाख रुपयाचा फायदा बँकेला झालेला आहे व याचे ऑडीट देखील झाले आहे. ऑडीट मध्ये कोणत्याच प्रकारचे ऑब्जेक्शन काढलेले नसतांना विरोधकांकडून होत असलेले हे आरोप बिनबुडाचे असुन आगामी निवडणुका लक्षात घेता विरोधकांचे हे बदनाम करण्याचे षडयंत्र आहे. बँकेची बदनामी केल्याबाबत प्रशासकांच्या वतीने पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. तर आम्हाला देखील बदनाम करणा.या विरोधात आम्ही कायदेशिर कारवाई करणार आहोत . असे यावेळी बबलु देशमुख यांनी सांगीतले.

Leave a Reply