नागपुरात एमडी ड्रग पावडर पकडली

नागपूर : १६ एप्रिल – अंमली पदार्थ विरोधी पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीवरून गणेशपेठ हद्दीतील बैद्यनाथ चौक येथून एका इसमाकडून ५३.४८ ग्रॅम एमडी ड्रग पावडर जप्त केली. याप्रकरणी गणेशपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, गणेशपेठ हद्दीत बैद्यनाथ चौकाजवळ सौरभ छपाने आणि संदीप नावाचा इसम होंडा शाईन गाडी क्र. एमएच/ ३१/एफ एल ९६0२ एमडी ड्रग घेऊन येणार आहेत, अशी माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यावर कारवाई करीत एनडीपीएस पथकाने साचळा रचून आरोपी सौरभ दादाराव छपाने (२२) रा. काटोल रोड, धम्मनगर आणि संदीप मुचकुंद पांडे (२१) रा. चिंतामननगर, भिवसनखोरी यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून ५३,४८ ग्रॅम एमडी ड्रग (कि. ५,३४,८00), २ मोबाईल आणि एक मोटारसायकल असा एकूण ६,१९,८00 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्य़ातील मुख्य सूत्रधार तसेच रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार अंकिश ऊर्फ गुलाम संजय तुर्केल रा.गोरखेडे कॉम्प्लेक्स, फ्रेंडस कॉलनी याच्याविरुद्ध आणि अटक आरोपीविरुद्ध गणेशपेठ पोलिस ठाण्यात अंमली पदार्थ कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. फरार आरोपी अंकिश तुर्केल याच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

Leave a Reply