कोरोना पॉझिटिव्ह असल्याच्या धक्क्यानेच रुग्णाचा मृत्यू

वर्धा : १६ एप्रिल – सिंदी (रेल्वे), येथील बाजार चौकात राहणाऱ्या एका रुग्णाला तपासल्यानंतर तो कोरोना बाधित असल्याची सूचना वैद्यकीय अधिकार्यांनी रुग्णाच्या मुलाला केली. आपण सकारात्मक असल्याचे कळताच त्याने प्राण सोडला. कोरोनाबाधित मृतदेह सेवाग्राम रुग्णालयात रवाना केला आहे.
सिंदी (रेल्वे) येथील 50 वर्षींय व्यक्ती गंभीर आजारी होता. स्थानिक आरोग्य केंद्रात त्याची प्राथमिक तपासणी करून सर्व नमुने वरिष्ठ अधिकार्यांकडे पाठविले होते, असे डॉ. प्रज्ञा वंजारी यांनी सांगितले. आज दुपारी 1 वाजता त्या रुग्णाचा अहवाल प्राप्त झाला म्हणून डॉ. वंजारी यांनी भ्रमणध्वनी वरून रुग्णाच्या मुलाला अहवालानुसार तुमचा रुग्ण कोरोना बाधित आहे अशी सूचना केली. त्यांना दिलेली औषधी नियमित घ्या, खण्यापिण्याकडे लक्ष पूर्व असा सल्ला दिला. स्थानिक वैद्यकीय चमू संपूर्ण घराला विलगिकरन कक्षात टाकण्याकरिता गेले असताना सदर रुग्ण कोरोनाच्या दहशतीच दगावल्याचे लक्षात आले.
या घटनेची माहिती मिळतात पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन सेवाग्राम येथील रुग्णालयात पाठविले. आज आठवडी बाजार आल्यामुळे ही वार्ता सर्वत्र पसरली. परंतु, गृहवीलगिकरणात असलेले अनेक रुग्ण बिधास्त शहरभर फिरत आहे. शहरातील बरेच रुग्ण शेती वाडीच्या व व्यापारी प्रतिष्ठानात वावरताना दिसतात. त्यामुळे येत्या आठवड्यात कोरोना बधितांची संख्या वाढू शकते. नगर पालिका प्रशासन, पोलिस यंत्रणे योग्य सहकार्य नसल्याची, अशी खंत डॉ. प्रज्ञा वंजारी यांनी व्यक्त केली आहे. स्थानिक पालिका प्रशासनाततील दोन कर्मचारी कोरोना बाधित आहे, हे येथे उल्लेखनीय !

Leave a Reply