रंग बदलत्या वाघा पाहून
सरड्यालाही वाटे लाज !
कालवरी तू भगवा होता
खुर्चीसाठी हिरवा आज !!
काय तुझा रे होता तोरा
काय तुझा अन होता माज !
आज मुखावर तुझ्या शोभतो
लाचारीचा हिरवा ताज !!
माज उतरला ऐटही गेली
उरली आता केवळ खाज!
काकापुढती हलवे शेपूट
वाघ कालचा टर्रेबाज !!
कवी– अनिल शेंडे।