मुलाचा गळा चिरून आईने केली आत्महत्या

यवतमाळ : १५ एप्रिल – यवतमाळ  तालुक्यातील उडदी येथे राहणाऱ्या  सख्ख्या आईने तिच्या तेरा महिन्यांच्या मुलाचा गळा चिरून स्वत: आत्महत्या केल्याची घटना दिनांक १२ एप्रिलच्या रात्री ७.२१ वाजता उघडकीस आली आहे. घटनेची माहिती मिळताच उडदी परिसरांमध्ये एकच खळबळ माजली असून गावच्या पोलिस पाटील यांनी ग्रामीण पोलिस स्टेशनला फिर्याद दिली असता गुन्हे दाखल केले आहे.

प्राप्त माहितीनुसार ग्रामीण पोलिस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या उडदी येथे राहणारी स्वाती ज्ञानेश्वर लोहेकर (वय २२) या विवाहितेने त्यांच्या राहत्या घरातील छताला नायलॉन दोरी बांधून आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी स्वातीने तिच्या वीर ज्ञानेश्वर लोहेकर (वय १३ महिने)या मुलाचा धारदार शस्त्राने गळा चिरून जिवानेच ठार केले होते. त्यानंतर स्वातीने तिच्या मुलाला पलंगावर ठेवून गळफास घेऊन आत्महत्या केली होती आत्महत्येची माहिती मिळताच परिसरामध्ये एकच खळबळ माजली होती व घटनेच्या ठिकाणी रक्ताचा थारोळे जमा झाला होता. विवाहितेने त्याच्या मुलाला ठार करून व स्वत: गळफास घेऊन आत्महत्या का केली याबाबत ग्रामीण पोलिस स्टेशन कडून शोध घेणे सुरू आहे. घटनेची माहिती गावचे पोलिस पाटील मिलिंद मधुकर राठोड यांनी ग्रामीण पोलीस स्टेशनला दिली. त्यानंतर ग्रामीण पोलिस स्टेशनचे बीट जमादार प्रशांत भवरे यांनी त्यांच्या टीमसह घटनास्थळ गाठले व पंचनामा करून दोघांचाही मृतदेह येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रात्री उशिरापयर्ंत आणला होता.

Leave a Reply