पाच वर्षापासून परार आरोपीस पोलिसांनी केली अटक

नागपूर: 15 एपिल– झिंगाबाई टाकळी मराठी प्राथमिक शाळेजवळ शफी नगर येथील रहिवाशी व मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले प्रमोद उर्फ गंगाराम गजभिये हे 14 दिवसाच्या संचित रजेवर आले होते. रजा भोगून आरोपीला 22 आॅक्टोबर रोजी स्वतःहून मध्यवर्ती कारागृह नागपूर येथे हजर व्हायचे होते. पंरतु ते हजर न झाल्याने मध्यवर्ती कारागृह अधिक्षक यांनी दिलेले पत्र फिर्यादी गजानन चोपडे यांच्या मार्फत प्राप्त झाल्याने कलम 224 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्हयामधील फरार आरोपीचा शोध घेतले असता मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मानकापूर पोलिस तपास पथकाने फरार आरोपीस गेल्या पाच वर्षापासून गोरेवाडा येथील सैलानी बाबा दर्गा येथे वास्तव्यास असल्याने त्यांला तेथून अटक करून मध्यवर्ती कारागृह अधिक्षकाच्या स्वाधीन करण्यात आले ही कारवाई नागपूर शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार, उत्तर प्रभाग नागपूर अप्पर पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी पोलिस उपायुक्त विनीता शाहू ,सहायक पोलिस आयुक्त सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैजयंती मंडवधरे, यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक कैलास मगर पोहवा रविंद्र भुजाडे नापोशि अंकुश राठोड अजय पाटील , पोशी रोशन वाडीभस्मे यांनी केली.

Leave a Reply