जीवनरोझ

तूझ्याचसाठी फुलले
हे रोझ जीवनाचे !
हार्टात बैसवूनी
प्रेझेंट तूज केले !।।

गाभारी टेम्पलाच्या
घुमते तुझेच सॉंग !
सॉंगातुनी मी बघतो
स्वप्नील हॉंगकॉंग! ।।

दिनरात मीच म्हणतो
तुजला ” इलू इलू लु “
तू मात्र कंटिन्यूअस
म्हणते ” आय हेच्यु हेच्यु”।।

हे बघ माय डियर
येवढेच तू रिमेम्बर
तूझ्याचसाठी रिझर्व्ह
माझे हे हार्ट चेंबर !।।

कवी — अनिल शेंडे ।

Leave a Reply