कोविड सेंटरमध्ये रुग्णांना पार्सलमधून विदेशी दारू व खर्रा पाठविण्याचा प्रकार यवतमाळात उघडकीस

यवतमाळ : १५ एप्रिल – कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णाला टरबुजमधून खर्रा तर फळांचा ज्यूस असल्याचे सांगून पार्सलमधून विदेशी दारू पाठविण्याचा प्रकार करोनाबाधित रूग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे. यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील हा प्रकार समोर आला. परंतु रूग्णालय प्रशासनाने त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला.
या करोनाबाधित रुग्णांसाठी त्यांच्याच नातेवाईकांनी ही अनोखी शक्कल लढविली होती. तर काही जणांनी रूग्णांना पार्सलमधून विदेशी दारू पुरविण्याचा प्रयत्नही केला. रूग्णांना दारू पाठविताना कोणाला शंका येऊ नये, यासाठी फळाचे ज्यूस व घरचं जेवण आहे, असे वाटावे या पध्दतीने रुग्णालयात खाद्यपदार्थ पार्सल करुन पाठवण्यात आले होते. परंतु सुरक्षा रक्षकांना संशय आल्याने त्यांनी ती पार्सल उघडून पाहिले असता. त्यात दारू असल्याचे उघडकीस आले.
करोना रूग्णांना उपचारासाठी दाखल केल्यानंतर काही दिवसांनी ते रूग्ण उपचार घेतल्या नंतर बऱ्यांपैकी धोक्यातून बाहेर आलेले असतात. त्यानंतर त्यांना आयसोलेशन वार्डमध्ये दाखल करण्यात येते. त्याच ठिकाणी असलेल्या रूग्णांच्या नातेवाईकांनी ही अफलातून शक्कल लढविली होती. मात्र हा प्रयत्न वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टर आणि सुरक्षा रक्षकांनी हाणून पाडला आहे.

Leave a Reply