वेलट्रीट हॉस्पिटलच्या प्रशासन आणि संचालकांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

नागपूर : १४ एप्रिल – वेलट्रीट हॉस्पिटलमधील अग्निकांडात चार जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी मिळालेल्या तक्रारीवरून हॉस्पिटलच्या संचालक आणि हॉस्पिटल प्रशासनाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, वेलट्रीट मल्टिस्पेशालीस्ट हॉस्पिटल वाडी येथे तुळशीराम सपकन पारधी (४७) रा. नटराज सोसायटी, गोरेवाडा, शिवशक्ती भगवान सोनबरसे (३५) रा.गोरेगाव, प्रकाश बापू बोळे (६९) रा. मनीषनगर आणि रंजना मधुकर कडू (४४) रा. धापेवाडा हे रुग्ण कोविड -१९ रोगाच्या उपचारासाठी भरती होते. ९ एप्रिलला रात्री ८ वाजताच्या सुमारास हॉस्पिटलमध्ये भयंकर आग लागली. या आगीत या रुग्णांचा मृत्यू झाला. हॉस्पिटलचे संचालक डॉ. राहुल ठवरे आणि हॉस्पिटल प्रशासनाने हॉस्पिटलमध्ये योग्य क्षमता आणि मानकानुसार विद्युत उपकरणे वापरली नाही. आग विझविण्याचे साहित्य हॉस्पिटलमध्ये ठेवले नाही. उचित व्यवस्था केली नाही. त्यामुळे ही दुर्घटना घडली. याप्रकरणी वाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Leave a Reply