‘आयएएसची पाऊलवाट’ हे पुस्तक आयएएसमधील मराठी टक्का वाढविण्यात मदत करणारे – नितीन गडकरी

नागपूर : १४ एप्रिल – संकेत भोंडवे यांचे ‘आयएएसची पाऊलवाट’ हे पुस्तक या अभ्यासक‘मासाठीच्या विद्यार्थी आणि तरुणांना प्रेरणा देणारे आणि मार्गदर्शक ठरेल. तसेच आयएएसमधील मराठी टक्का वाढविण्यात मदत करणारे आहे,असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
‘आयएएसची पाऊलवाट’ या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी ना. गडकरी बोलत होते. याप्रसंगी ऑनलाईन डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, पुण्याचे माजी विभागीय आयुक्त दिलीप बंड आणि विश्वकर्मा प्रकाशनचे विशाल सोनी उपस्थित होते. संकेत भोंडवे हे 2007 च्या आयएएस बॅचचे मध्यप्रदेश कॅडरचे अधिकारी आहेत. आज या पुस्तकाच्या सातव्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना नितीन गडकरी म्हणाले- संस्काराचे बाळकडू संकेत यांना त्यांच्या आईवडिलांकडून मिळाले असल्यामुळेच त्यांचे संस्कारक्षम व्यक्तिमत्त्व घडण्यात त्यांच्या आईवडिलांचे योगदान अधिक आहे.
आयएएस पास होण्यासाठी काय केले पाहिजे, हे या पुस्तकात सांगितले आहे. त्यामुळेच नवीन उदयोन्मुख तरुणांना, विद्यार्थ्यांना हे पुस्तक मार्गदर्शक ठरणार आहे. समाजामध्ये वावरताना सामाजिक दायित्व आणि सामाजिक जाणीव खूप महत्त्वाची आहे. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, यांच्यासाठी संकेत यांनी सामाजिक दायित्वाच्या भावनेतून जे काम केले ते विशेष उ‘ेखनीय आहे, असेही ते म्हणाले.
सामाजिक आर्थिक दृष्टीने मागासलेले आहेत, अशा समाजातील दिव्यांग, अपंग, निराधार यांना आपल्या परिवाराचे एक घटक आहेत, असे समजून राजकीय नेत्यांनी व प्रशासनातील अधिकार्यांनी वागण्याची गरज असल्याचे सांगून नितीन गडकरी म्हणाले- जिद्द, चिकाटी, परिश्रम, ध्येय आणि स्वकीयांचे मार्गदर्शन हे पाच सूत्र आयएएस यशस्वी होण्यासाठी आवश्यक असल्याचे या पुस्तकातून सांगण्यात आले आहे. कल्याणकारी राज्यात अधिकार्याकडे सकारात्मकता, पारदर्शकता, भ‘ष्टाचारमुक्त प्रशासन, वेळेत निर्णय घेण्याची क्षमता असावी. गुणवत्तेशी त्याची कटिबध्दता असली पाहिजे. प्रत्येकाला काम मिळावे. आर्थिक अंकेक्षण झाले नाही तरी चालेल पण प्रत्येकाच्या कामगिरीचे अंकेक्षण झाले पाहिजे, असेही गडकरी यांनी सांगितले.

Leave a Reply