संपादकीय संवाद

नमस्कार मंडळी,
आज चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच वर्षप्रतिपदा, आपण गुढीपाडवा म्हणून हा दिवस साजरा करतो.
हिंदू परंपरेनुसार आज नवे वर्ष सुरु होते त्यानिमित्ताने आपणा सर्वांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा…
सुमारे महिनाभरापूर्वी आम्ही समाजमाध्यमांवरून पंचनामा या आमच्या नव्या न्यूज पोर्टलची आपल्याला माहिती दिली होती. सत्य बातमी आणि अचूक विश्लेषण हे घोषवाक्य घेऊन आम्ही काम सुरु करू असे त्यावेळी आम्ही घोषित केले होते. त्यानुसारच आम्ही ही सुरुवात आजच्या सुमुहूर्तावर करीत आहोत ठिकठिकाणी घडणाऱ्या बातम्यांबाबत आम्ही वेळोवेळी आपल्याला माहिती देऊच. त्याचबरोबर घडणाऱ्या घटनांचे अचूक विश्लेषण करणारे मान्यवरांचे विश्लेषणात्मक लेख हे पंचनामाचे वैशिष्ठ्य असेल.
सध्या आम्ही मुद्रित स्वरूपात आपल्याला ही सेवा उपलब्ध करून दिली आहे मात्र लवकरच मान्यवरांनी केलेले व्हिडीओ विश्लेषण आणि महत्वाच्या घटनांच्या व्हिडीओ क्लिप्स हेदेखील आमचे वैशिष्ठ्य असेल.
आपल्या मौल्यवान सूचनांचे आम्ही स्वागतच करू आपण आपल्या सूचना ९८९००१९३८३ आणि ९०९६०५०५८१ या भ्रमणध्वनीवर वॉट्सअँपच्या माध्यमातून करू शकता. आपल्या बातम्या आणि लेख हे आपण panchanamanews@gamil.com या इ-मेल वर पाठवू शकता.

नववर्षाच्या शुभेच्छांसह
आपला स्नेहांकित
अविनाश पाठक
मुख्य संपादक

Leave a Reply