यवतमाळमध्ये बेडच नाही, ओपीडीबाहेरच झोपून रुग्ण काढत आहेत रात्र

यवतमाळ : १३ एप्रिल – राज्यातील कोरोना स्थिती अतिशय गंभीर आहे. एकीकडे रुग्णांची संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होताना पाहायला मिळत आहे, तर दुसरीकडे आरोग्य सुविधांच्या कमतरतेमुळे रुग्णांचा जीव धोक्यात टाकावा लागत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये ऑक्सिन बे़डची कमी, व्हेंटिलेटरची कमी तर काही ठिकाणी रुग्णालयात जागाच नसल्यानं अनेक रुग्ण रुग्णालयाबाहेर तीन- चार दिवस बेडसाठी वाट पाहात आहेत. अशीच परिस्थिती आहे यवतमाळ जिल्ह्यात. यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात कोरोना रुग्णाची परिस्थिती भयंकर आहे. जिल्ह्याच्या बाहेर असणारं शासकीय रुग्णालय पूर्ण भरलं आहे. यामुळे, रुग्णांना दाखल करुन घेण्यासाठीही बेड उपलब्ध नसल्याची स्थिती आहे. रुग्णांना बेडच्या प्रतीक्षेत अक्षरशः ओपीडीबाहेर झोपून राहावं लागत आहे. धक्कादायक बाब म्हणजे ऑक्सिजनची गरज असणारे अनेक रुग्णही बाहेर बेंचवर बसून आहेत. खुर्चीवरच या रुग्णांना ऑक्सिजन पुरवला जात आहे.
एका रुग्णाला दाखल करून घेण्यासाठी साधारण दोन ते तीस तास वेळ लागत असल्याची स्थिती आहे. त्यामुळे रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना प्रचंड समस्यांचा सामना करावा लागत असल्याचं समोर आलं आहे. या संपूर्ण प्रकराचे व्हिडीओदेखील समोर आले आहेत.

Leave a Reply