नागपूर : १३ एप्रिल – कोरोनाच्या उपचारांमध्ये महत्त्वपूर्ण ठरत असलेल्या रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा काळा बाजार होत असल्याची घटना ताजी असतानाच आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागपुरात मुदत उलटून गेलेल्या (एक्स्पायरी डेट) रेमडेसिव्हीर इंजेक्शनची विक्री होत आहे. एक्स्पायरी डेट नमूद केलेल्या जागी नवे स्टिकर चिकटवून रेमडेसिव्हीर इंजेक्शन्स रुग्णांच्या नातेवाईकांना विकली जात आहेत. त्यामुळे नागपुरात मोठी खळबळ उडाली आहे.
राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा सध्या तुटवडा जाणवत आहे. मर्यादित साठा असल्यामुळे रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा काळाबाजार सुरु झाला होता. ही इंजेक्शन्स अव्वाच्या सव्वा भावाने विकली जात होती. त्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा काळाबाजार करणाऱ्या व्यावसायिकांना कारवाईचा इशारा दिला होता. मात्र, आता एक्स्पायर झालेली रेमडेसिव्हीर इंजेक्शन्स विकून रुग्णांच्या जीवाशी खेळ केला जात आहे. त्यामुळे आता प्रशासन याविरोधात काय कारवाई करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
000000000000