डॅा.नीलम गोऱ्हे यांचे मृतदेहांच्या झालेल्या विटंबनेबाबत भंडाऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

भंडारा : १३ एप्रिल – करचखेडा (भिलेवाडा), जि.भंडारा येथे कोरोना रुग्णांचे अर्धवट जळालेले मृतदेह कुत्र्यांनी गावात आणल्याचा भयंकर प्रकार उघडकीस आल्याचे वास्तव दि.११ एप्रिल,२०२१ रोजी समाजमाध्यमाद्वारे समोर आले आहे. अनेक ठिकाणी कोरोनाबाधित रुग्णांना मानसिक आणि शारीरिक त्रास होत आहे. मात्र, बाधित रुग्णांचे मृत्यूनंतरही हाल होत असल्याचे मीडिया ने छापण्यात आले होते.
स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे अर्धवट जळालेले मृतदेह बेवारस कुत्रे गावात आणून त्यांचे लचके तोडत आहेत. याबाबत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनी मृतदेह पूर्णपणे जळाल्यानंतरच स्मशानभूमी सोडावी आणि कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या मृतदेहांची हेळसांड होणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच असे प्रसंग पुन्हा घडणार नाहीत याची दक्षता घ्यावी असे निर्देश विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी जिल्हाधिकारी भंडारा यांना दिले आहेत.
उपरोक्त घटनेची वस्तुस्थिती तपासुन तात्काळ जिल्हा प्रशासनाने याबाबतच्या उपाययोजना करावी असेही डॉ. नीलम गोऱ्हे यांनी निर्देश दिले आहेत.

Leave a Reply