नागपूर : १३ एप्रिल – नागपूरसह पूर्व विदर्भात कोरोनाचा प्रकोप वाढतच असून आज पूर्व विदर्भात तब्बल १०९०८ रुग्णांची नोंद झाली असून त्यात एकट्या नागपुरात ६८२६ रुग्ण आहेत तर पूर्व विदर्भात आज ९९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे त्यात नागपूरच्या ६५ मृत्यूचा समावेश आहे. भंडारा शहरात रुग्णांची वाढती संख्या डोकेदुखी ठरत असतानाच आज चंद्रपूर शहरात देखील रुग्णवाढीने उसळी घेतली आहे आज भंडारा शहरात ११३५ तर चंद्रपूरमध्ये तब्बल १०१० रुग्णांची नोंद झाली आहे.
गेल्या २४ तासात राज्याच्या उपराजधानीत ६८२६ रुग्णांची नोंद झाली असून एकूण रुग्णसंख्या २९१०४३ वर पोहोचली आहे. आजच्या रुग्णांमध्ये २१४४ रुग्ण ग्रामीण भागातील ४६७५ शहरातील तर ७ रुग्ण इतर जिल्ह्यातील आहे. आज नागपूर जिल्ह्यात ६५ रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यात ग्रामीण भागातील २२ शहरातील ३६ तर इतर जिल्ह्यातील ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण मृत्युसंख्या ५९०३ वर पोहोचली आहे.
आज २९१२२ रुग्णांच्या चाचण्या घेण्यात आल्या असून त्यात ११७३६ ग्रामीण भागात तर १७३८६ चाचण्या शहरी भागात घेण्यात आल्या. ३५१८ रुग्ण आज कोरोना मुक्त झाले आहेत एकूण कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या २२४०७८ वर पोहोचली आहे तर कोरोना बरे होण्याचे प्रमाण ७६.९९ टक्क्यावर गेले आहे. सध्या नागपूर शहरात ६१०६२ ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यात २२४०५ ग्रामीण भागातील तर ३८६५७ रुग्ण शहरातील आहेत.