एम्स रुग्णालयात सातशे पन्नास रुपयात सिटीस्कॅन ची सुविधा

नागपूर : १३ एप्रिल – कोरोना बाधित रुग्णांसाठी एम्स हॉस्पिटलमध्ये अखिल भारतीय आयु्विज्ञान सस्था मिहान येथे सिटीस्कॅन ची सुविधा आज पासून सुरु झाली आहे . कोरोना बाधित रुग्णांसाठी ही सुविधा केवळ सातशे पन्नास रुपयात उपलब्ध असल्याची माहिती एम्स च्या संचालिका डॉक्टर श्रीमती विभा दत्ता यांनी आज दिली.
कोरोना रुग्णांसाठी सिटीस्कॅन आवश्यक आहे. गरीब व गरजू रुग्णांना ही सुविधा सवलतीच्या दरात उपलब्ध व्हावी यासाठी एम्स हॉस्पिटल येथे केवळ 750 रुपयात सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. एमएस मध्ये सिटीस्कॅन सकाळी नऊ वाजेपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू राहणार आहे कोरोना बाधीत रुग्णांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आव्हान विभागीय आयुक्त डॉ संजीव कुमार यांनी केले आहे.

Leave a Reply