वीज वितरण केंद्रातील तंत्रज्ञाला मारहाण करणाऱ्यांवर कारवाई न केल्यास कामबंद आंदोलन

वाशीम : ४ मार्च – मंगरुळनाथ तालुक्यातील आसेगांव वीज वितरण केंद्रातील तंत्रज्ञाला मारहाण करणार्यांवर कारवाई करावी अन्यथा 5 मार्चपासून काम बंद आंदोलन करण्याचा ईशारा वीज वितरण कंपनी च्या कृती समितीच्या वतीने उपविभागीय पोलिस अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. निवेदनात नमूद आहे की,आसेगाव वीज वितरण केंद्रातील तंत्रज्ञ बाळू आडे हे 1 मार्च रोजी दाभडी येथे वीज बिल वसुली करीत असतांना तेथील सुमित महल्ले यांनी नाहक वाद घालून आडे यांना लाथा,बुक्क्याने मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणाची तक्रार आसेगावं पोलिस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी किरकोळ नोंद केली. 

यामुळे उपविभागातील सर्व जनमित्रांचे मानसिक खच्चीकरण झाले असून, या प्रकारानंतर इतरही ग्राहकांकडून जनमित्रांना मारहाण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महल्ले यांचेवर विविध कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात यावे अन्यथा 5 मार्च पासून काम बंद आंदोलन करण्याचा ईशारा देण्यात आला आहे. निवेदनावर कृती समितीचे आकाश घोडे, रुपेश पांडे, आवेश राठोड, मंगेश कल्याणकर, दिनेश भगत, दिनेश पोफळे, विष्णु साखरे,उमेश सुर्वे आदींच्या स्वाक्षर्या आहेत.

Leave a Reply