नागपुरात कोरोना ब्लास्ट, २४ तासात ११५२ बाधित रुग्ण

नागपूर : ३ मार्च – नागपूरसह विदर्भात कोरोनाचा ब्लास्ट झाला असून नागपूर जिल्ह्यात २४ तासात ११५२ तर पूर्व विदर्भात एकूण १३६६ बाधित रुग्ण आढळल्यामुळे प्रशासन खळबळून जागे झाले आहे. नागपूर जिल्ह्यात २४ तासात ६ जणांचा मृत्यू झाला आहे.
२४ तासात ११५२ बाधित रुग्ण आढळले असून ८९७ शहरात २५२ ग्रामीण भागात ३ इतर जिल्ह्यातील आहेत. आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या १५२४१२ वर पोहोचली आहे. ६ रुग्णांच्या मृत्यूंपैकी २ शहरातील १ ग्रामीण आणि ३ इतर जिल्ह्यातील आहेत.  सध्या नागपूर जिल्ह्यात ९२९५ ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नागपुरात ७६३१ तर ग्रामीण भागात १६६४ रुग्ण आहेत. आज शहरात ११७५० चाचण्या झाल्या त्यात शहरात ७४२६ तर ग्रामीणमध्ये ४३२६ चाचण्या झाल्या आहेत.

Leave a Reply