समृद्धी महामार्गावर पुन्हा एक भीषण अपघात, १ ठार ३ जखमी

अमरावती : २२ जानेवारी – समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे. आता आणखी एक भीषण अपघात या महामार्गावर झाला आहे. कार डिव्हायडरला धडकून झालेल्या या अपघातामध्ये एक जण जागीच ठार झाला असून, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहेत. धामणगाव रेल्वे तालुका परिसरात हा अपघात झाला आहे. अपघाताचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही मात्र चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं ही कार डिव्हायडरला धडकल्याचा प्राथमीक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वेच्या हद्दीत समृद्धी महामार्गावर एका कार डिव्हायडरला धडकली. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातामध्ये एक जण जागीच ठार झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हा अपघात नेमका कसा झाला याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र वाहकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
हा अपघात इतका भीषण होता की, अपघातग्रस्त कारची मागची आणि पुढची बाजू पूर्णपणे डॅमेज झाली आहे. या कारची अवस्था पाहूनच या भीषण अपघाताची कल्पना येते.

Leave a Reply