सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

बेलगाम राखी – फातिमा नावे बुरख्यात बंदिस्त !

नीरू भेडा ते राखी सावंत ते फातिमा झालेले बेलगाम वादळ अखेर हिजाब बुरख्या मध्ये बंदिस्त झाले. प्रश्न हा नाही की बेलगाम वादळ बंदिस्त झालं! प्रश्न हा आहे की बुरख्यामध्ये किंवा हिजाबमध्ये आल्यानंतर बंदिस्त झालं! काय हिंदू जनमानसात आता दम राहिला नाही आपल्या मुलींना सांभाळण्याचा की हिंदू समाज मुलींना खुप जास्त सूट देतो की हिंदू संस्कार देण्यात हिंदू समाज तोकडा पडतो? ह्या सर्व प्रश्नांची कारणमिमांसा करण्याची वेळ आली आहे, त्यानुसार कार्यरत होण्याची वेळ आली आहे. कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सांगितल्याप्रमाणे २०५० पर्यंत हिंदू समाजाची फार वाईट परिस्थिती येणार आहे. प्रत्येक वेळी आवर्जून सांगावेसे वाटते की कॉंग्रेस मध्ये असणारे डॉक्टर हेडगेवार ह्यांची दूरदृष्टी बघा! ज्यावेळी कॉंग्रेस चा उदो उदो होत होता. त्यावेळी १९२५ साली त्यांनी ताडले की कॉंग्रेस पक्ष हिंदू समाज विरोधी पक्ष आहे. शांतीदूतांचा उदो उदो करणारा पक्ष आहे. वाईट ह्याचे वाटते की जी गोष्ट ९७ वर्षांपूर्वी डॉक्टर हेडगेवार ह्यांना कळले होते ते आजपर्यंत हिंदू समाजाला समज येवू नये. हे भारतीयांचे दुर्दैव आहे. त्यासाठी डॉक्टर हेडगेवार कॉंग्रेस पासून विलग झाले आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. तो त्यांचा निर्णय बरोबर आहे हे आज सत्यापित झाला आहे.
आजदेखील कॉंग्रेस पक्षात हिंदू समाजाचा भरणा भरपूर आहे तर प्रसंगी हिंदू विरोधी धोरणांना पाठिंबा देणारे हिंदू समाजातील लोक आढळतात. हा हिंदू समाजाचा दैवदुर्विलास आहे. आज जर १०० करोड हिंदू एकजूट झाला तर पुन: अखंड नवभारत उभा करण्याची ताकद भारतामध्ये येऊ शकते हे निश्चित. नवभारत म्हणजे अखंड भारत. पण वेळोवेळी आरक्षण, जाती जाती मधील वैमनस्य, ब्राम्हणांवर कुठराघात, अशी वेगवेगळी कारणांवरून राजकारण्यांनी भांडणे लावली आणि हिंदू समाज त्याला बळी पडला. सर्वात मोठी गंमत म्हणजे ज्या मराठा छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड समाज एकजूट केला त्या मराठा समाजाचे वर्चस्व आजतागायत महाराष्ट्रावर आहे आणि होते. तोच् मराठा समाज आता आरक्षण मागतोय आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज पुढाकार घेताहेत. सुरुवात शरद पवारांनी केली, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांनी मराठा आरक्षणाची सोय करुन त्यांच्या मागणीला दुजोरा दिला आणि आरक्षण रद्द झाल्यावर अठरा पगड जाती एकत्र आणणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा मराठा असण्याचा उपयोग मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी करण्यात येतोय हे बघून मनात विचार येतो! “आज छत्रपती शिवाजी महाराज असते तर त्यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीवर शिक्का मोर्तब केला असता का? बेलगाम राखीला फातिमा बनल्यानंतर लगाम लागला! ते छत्रपतींना मान्य झाले असते का? धर्मांतरण होवू नये ह्यासाठी प्रयत्न झाले ते छत्रपती शिवाजी महाराजांकडून. आपला धर्म शाबूत ठेवण्यासाठी कित्येक लोकांना परत हिंदू धर्माची कवाडे उघडी करून दिली. त्यानंतर धर्मभास्कर पाचलेगावकर महाराजांनी लाखो शांतीदूतांची घरवापसी करून दिल्याची उदाहरणे आहेत. मात्र आजचे राजकारणी आपले हिंदुत्व विसरलेले राजकारणी आहेत आणि त्याचा खासा भुर्दंड हिंदू समाज भोगत आहे. राहुल गांधी, शरद पवार, कॉमरेड मंडळी, सपा, बसपा, शिवसेना (उबाठा) ….. हे सर्व हिंदू विरोधी पक्ष जे पक्ष हिंदू बांधव चालवताहेत तर राहुल गांधी थंडीत टी शर्ट घालून ते तपस्वी आहेत. थंडीचा त्यांना तपस्वी असल्याने फरक पडत नाही. असे सांगत लोकांना उल्लू बनवत आहेत. मग त्यांचे दारु पिऊन टल्ली झाल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. एकंदर काय ह्या सर्व हिंदू विरोधी राजकारण्यांना हिंदू धर्म, छत्रपती शिवाजी महाराजांचे आचरण ह्यापेक्षा सत्तेत येणे महत्त्वाचे वाटते. कारण सत्तेत आल्यानंतर हिंदू खच्चीकरण करणे सोपे असते.
मविआ सरकार अस्तित्वात आल्यानंतर त्याचा हिंदू विरोधी परिणाम आपण बघितलाच् आहे. हिंदू सण आले की लगेच लॉक डाउन तर ईदेला सब जगत चालू. तरी गंमत म्हणजे हिंदू असल्या पक्षांना आजही आपले मतं देतो ही हिंदू समाजाची विडंबना आहे.
९६ कुळी मराठा गोत्रामध्ये “सावंत” हे आडनाव आहे. वंश – चंद्र गोत्र – दुर्वास, देवक – कमळ, कळंब, साळुंकी, पंख असे “मराठ्यांचे प्राचीनत्व ९६ कुळी” मध्ये सांगितले आहे.
एको दस सहस्त्रणि योधयेद्यस्तु धान्विनाम!
शस्त्रशास्त्रप्रवीतश्च स वै प्रोक्तो महाराज:!
अमितान्योधयेद्यस्तु संप्रोक्तोsतिरथस्तु स:!
रथस्त्वेकेन योद्धा स्यात्तन्न्यूनोsर्धरथ: स्मृती:!
भावार्थ – शस्त्रशास्त्रात म्हणजे रणविद्येत प्रवीण होऊन जो एकटा क्षत्रिय दहा हजार योद्ध्यांबरोबर लढू शकतो, त्या रणधुरंधरासच मरहट मराठा म्हणतात. मराठ्यांचा उल्लेख “श्री वाल्मिकी रामायण” अयोध्या कांड सर्ग ५१ श्लोक ६ यात दशरथाला “महाराष्ट्रे” (महारठ्ठे) विवर्धन असे म्हटले आहे.
मात्र आज आमचे “मराठा” नेता “एको दस सहस्त्रणि..” ह्या भावार्थात येतात का? जे नाव “सावंत” जे मराठ्यांचे ९६ कुळांमध्ये येते ती राखी सावंत आदिल नावाच्या शांतीदूताशी आपला निकाह करुन फातिमा होते तेव्हा मराठा समाजात खरे काय सुरू आहे आणि हा समाज कुठे चालला आहे ह्याबद्दल फार वाईट वाटते. आमचे मराठा राजकारणी नेता खरेच् आपापल्या प्रांतात निपुण आहेत का? की बारावा बॉंबस्फोट मुस्लिम बहुल भागात झाला असे खोटे विधान करुन आपल्या हिंदू बांधवांना फसवतात? भाजपा सोबत युती करून मग असल्याच् पक्षाशी युती करून हिंदू विरोधी कारवाया करतात? कुठे गेला मराठा पराक्रम? काय सत्तेसाठी मराठा लाचार होतो का? अशी अनेक प्रश्नांची प्रश्नावळ डोक्यात येते.
आजवरचा इतिहास बघता नीरू भेडा-राखी सावंत चे जन्मनाव. तिची आई जया भेडा ने कॉन्स्टेबल आनंद सावंत यांचेशी दुसरे लग्न केले नी राखीला सावंत हे नाव मिळाले. लहानपणापासून नीरूला नाचण्याची प्रचंड आवड. पण घरी नाचण्याची बंदी त्यामुळे ती मामाकडून नेहमी मार खायची. २५ नोव्हेंबर १९७८ रोजी जन्मलेल्या नीरु चे बालपण अत्यंत हलाखीत गेले. परिस्थितीमुळे तिला वयाच्या दहाव्या वर्षापासून काम करावे लागले. एका मुलाखतीत ती सांगते की तिने टिना अंबानी – अनिल अंबानी चे लग्नात वाढप्याचे काम केले. त्यावेळी तिला ५० रूपये मानधन मिळाले होते. वयाच्या अकराव्या वर्षी तिला दांडिया कार्यक्रमात भाग घ्यायचा होता पण तिला जाऊ दिले नाही. त्याऐवजी तिच्या आईने तिला खूप मारले, तिचे केस कापून विद्रूप करण्याचा प्रयत्न झाला. राखी ला ह्या सर्व प्रकाराचा खुप धक्का बसला नी तिने ठरवले की आई वडिलांच्या इच्छेविरुद्ध जाऊन बॉलिवूड मध्ये कामे करण्याचा प्रयत्न करायचा.
२००३ मोहोब्बत है मिर्ची ह्या गाण्याने तिचे नशीब बदलले. मै हु ना, मस्ती अशा मोठ्या चित्रपटात तिला छोट्या भूमिका वठवल्या. ती म्हणते महेश मांजरेकर ने माझे बॉलिवूड क्षेत्रातील नामकरण केले. राही – राखी ह्या दोन नावांपैकी एक नाव त्यांनी सुचविले आणि मी “राखी” हे नाव कायम केले असे ती म्हणते. यानंतर बऱ्याचशा चित्रपटात तिने छोट्या छोट्या भूमिका साकारल्यात. टीव्ही रिऍलिटी शो “जरा नच के दिखा” “नच बलिए ३” बिग बॉस मध्ये सुद्धा ती दिसली. “राखी का स्वयंवर” हा शो तिने केला. तोकडे कामोत्तेजक कपडे, भडक विधाने, वादग्रस्त बेलगाम विधाने ह्यासाठी ती नेहमी चर्चेत राहिली. एवढेच् नव्हे तर बेलगाम राखीने अभिषेक अवस्थी ला सार्वजनिक ठिकाणी कानशिलात लगावली आहे. आणि बॉलिवूड मध्ये चर्चेत राहण्यासाठी जे काही करता येत असेल सर्व काही राखी ने केले.
अगदी राजकारणात सुद्धा आपले नशीब आजमावले. २६ मार्च २०१४ रोजी तिने “राष्ट्रीय आम पार्टी” स्थापन केली. २०१४ लोकसभा निवडणूक मुंबई उत्तर-पश्चिम ला १५ मते मिळाली आणि शेवटी ती आठवले साहेबांच्या आरपीआय मध्ये जून २०१४ मध्ये सामिल झाली.
बेलगाम राखी चे नाव अभिषेक अवस्थी, एलेश पारुजनवाला, दीपक कलाल आणि शेवटी रितेश ह्यांच्याशी जोडले गेले. तिचे मिडिया मधील बोल, बेलगाम वागणे बऱ्याचदा कामोत्तेजक असायचे ह्याच कारणाने मिका सिंगने तिचा होकार गृहित धरून तिचे सर्वांसमक्ष चुंबन घेतले. पुढे तिने केस केली वगैरे हा नंतरचा भाग. सांगण्याचे तात्पर्य “राखी सावंत” हा बॉलिवूड मधील बेलगाम असा कामोत्तेजक फटाका होता. राखी ने आपल्या करियर ची सुरुवात एक म्युझिक अल्बम ने केली. त्यानंतर बॉलिवूड मध्ये आल्यानंतर ती सतेत चर्चेत राहिली. अनिर्बंध जीवनाचा बेलगाम आवेग तिने अनुभवला.
एवढेच नव्हे तर चर्चेत राहण्यासाठी ती कुठल्या थराला जाईल ह्याचा भरवसा नाही. स्वामी रामदेव बाबा ह्यांचे बद्दल केलेले तिचे विधान तिला परत एकदा चर्चेत घेऊन येते. ती म्हणाली ,” योगगुरू रामदेव बाबा यांच्याशी लग्न करायला माझी हरकत नाही. त्यांच्याकडे खुप पैसा आहे. महागड्या गाड्या आहेत. जर लग्न झाल तर तुम्हाला गलॅमरस साध्वी पाहायला मिळेल.” पुढे ती म्हणाली की रामदेव बाबा मला हॉट वाटतात. बॉलिवूड मधील नट्यांना एक वय झाले की कायमस्वरूपी स्थायी पत्नी होण्यासाठी नवरा लागतो. अशा वर संशोधनात राखी वास्तविकता कमी आणि मनातले मांडे किंवा स्वप्नरंजनाचा भाग जास्ती आणि मुख्य मुद्दा म्हणजे अशी तिची विधानं चर्चेत येणे आणि सर्वामुखी एकदा परत राखीचे नाव गाजते.
त्याचप्रमाणे तिने केलेले पंतप्रधान मोदींबद्दल चे केलेले विधान तर फार जास्त अश्लील आहे. तिने बुस्टर डोझ घेतला आणि तिच्या म्हणण्यानुसार अतिशय तीव्र कामोत्तेजना आली आणि तिने सरळ तिचा प्रियकर आदिल दुर्रानी ह्याच्याकडे शरीरसुखा साठी कुच केले. आणि तिने हे सर्व एअरपोर्ट वर खुल्लमखुल्ला सांगितले. मात्र मोदींबद्दल तिच्या भावना सात्विक आहेत. एक संत माणूस म्हणून सांगते. मोदींना ती पुर्णतः ब्रम्हचारी म्हणते.
तर अशी ही कोणाच्याही काबुत न येणारी राखी सावंत. आदिल खान दुर्रानी शी निकाह करती झाली आणि तोकड्या कामोत्तेजक कपड्यात वावरणारी फातिमा बुरख्या मध्ये बंदिस्त झाली. हे सामर्थ्य आहे शांतीदूतांच्या धर्माचे. बाहेर कितीही निकाहपुर्वी लफडे केले असतील पण आता जर निकाह केला तर हिजाबमध्ये उर्वरित आयुष्य राहावे लागणार.
तिच्या सवयीप्रमाणे मिडिया समोर येवून येवून आदिल आदिल आदिल करीत करीत तिने तिचा निकाह देखील सोशल मिडिया वर गाजवला. आदिल ने देखील आपल्या धर्माची आन राखत , राखीला पहिले अंगाखाली घेतले. तिच्याशी निकाह केला. गुलदस्त्यात ठेवला. त्याला माहिती की राखी नावाचं वादळ घरी आणलं तर शमवायचं कसं? शांतीदूतांचा धर्म स्त्री ला मुक्त संचार, वागणूक देत नाही. त्यामुळे निकाह झाल्यानंतर सुद्धा आदिल ने निकाह पुर्णतः कबुल कधी केला नाही. पहिले आपल्या बहिणींचे लग्न होणार नाही हे कारण सांगितले तर अम्मी अब्बा राजी नाही अशी कारणे सांगितली. आदिल ने पत्रकारांना सांगितले की दहाबारा दिवसांमध्ये सर्वासमोर सांगतो की निकाह झाला की नाही हे सांगतो, तोपर्यंत धीर धरा. अशा विविध धोरणांचा अवलंब करीत आदिल ने फातिमा शी लावलेल्या निकाह सर्वांसमक्ष कबुल करण्यात विलंब लावतोय. राखी ची फातिमा झालेली धर्म बदललेली बेलगाम अभिनेत्रीला पहिले आपल्या धर्माचे धडे देतोय. आणि आज तिचा बुरखा हिजाब घातलेला फोटो बघितला. शौहर ने सर्वांदेखत आपला निकाह कबुल करावा ह्यासाठी तिला तळमळत ठेवले आणि जर तुला आमच्यात राहायचे असेल तर पायरी राखुन वाग ही समज दिली असणार. आणि बेलगाम राखी बुरख्यात बंदिस्त झाली. ही आहे शांतीदूतांच्या धर्माची ताकद. “स्त्री” ला त्यांच्या धर्मानुसार वागवणारा शौहर.
खरे बघितले तर मामला “लव्ह जिहाद” चा एका ही मिडिया ने, पत्रकाराने, लेखकाने हा लव्ह जिहाद चा मामला आहे असे म्हटले नाही उलट राखी ला प्रोत्साहित केले. सावंत नाव ९६कुळी मराठ्यात येते. ती मुलगी आता मुसलमान घरी बिवी म्हणून जाणार. आता मिया बीवी राजी म्हटल्यावर कोण काय करणार? हे सर्व पटतंय का आपल्याला? मात्र हा निकाह टिकतो किती काळ हे मनोरंजक ठरेल. असे निकाह फक्त काही काळ टिकतात. शांतीदूतांना हवी असणारी स्त्री च्या शरीराची मजा कमी वा फिकी पडली की समजावे तलाक ची वेळ जवळ आली. किंवा शौहर दुसरा निकाह करणार.
आणि जी ओढ घेत ह्या मुली शांतीदूतांशी निकाह करतात त्याची परिणती शेवटी शोकांतिकेत होते. हे माहिती असताना देखील मुसलमानेतर मुली शांतीदूतांच्या जाळ्यात फसतात ही फार मोठी शोकांतिका आहे. एखादीच् शर्मिला टागोर निपजते बाकी सगळा मामला “अमृता सिंग” सारखा असतो.
मराठा असणारी बेलगाम राखी सावंत – फातिमा नावे बुरख्यात बंदिस्त झाली.

भाई देवघरे

Leave a Reply