पुणे : १५ डिसेंबर – पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना घडली आहे. नदीपात्रात पाण्याची मोटार ढकलत असताना विजेचा धक्का लागल्यामुळे एकाच शेतकरी कुटुंबातील 4 जणांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे. यामध्ये वडील आणि मुलाचाही समावेश आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नरसापुरजवळ निगडे गावात ही घटना घडली आहे. भोर तालुक्यातील निगडे धांगवडी येथे गुंजवणी नीरा नदीपात्रात ही घटना घडली आहे. पाण्यात मोटार ढकलत असताना अचानक गेलेली वीज परत आली आणि पाण्यात वीजप्रवाह उतरल्यामुळे एकाच कुटुंबातील चौघांचा विजेचा जबर धक्का बसला, त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये बापलेकांचा समावेश आहे.
विठ्ठल सुदाम मालुसरे, सनी विठ्ठल मालुसरे, अमोल चंद्रकांत मालुसरे, आनंदा ज्ञानोबा जाधव (सर्व रा. निगडे ता.भोर जि. पुणे) अशी मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. या घटनेची माहिती मिळताच वीज मंडळ व पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत.