अमरावतीत शिक्षणाचा बट्ट्याबोळ, मुख्याध्यापक शाळेच्या वर्गातच दारुन पिऊन झोपला

अमरावती : २३ नोव्हेंबर – शिक्षकाचे स्थान हे समाजात आदर्श असते. शिक्षकाला आदर्श मानले जाते. मात्र, अमरावती जिल्ह्यामध्ये एका शिक्षकाने या विचाराला काळिमा फासत शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाल्याचे समोर आले आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमध्ये घडलेल्या या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.
मेळघाटात शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाल्याचे समोर आले आहे. शाळेतील वर्ग खोलीतच मुख्याध्यापक दारू पिऊन झोपला होता. मेळघाटातील काटकुंभ येथील जिल्हा परिषद शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला. त्यानंतर या शिक्षकाने तिथेच लघुशंकाही केली. दारू पिऊन वर्ग खोलीत झोपला असलेल्या अवस्थेत मुख्याध्यापकाचा व्हिडिओसुद्धा समोर आला आहे. अविनाश राजनकर असं दारुड्या मुख्याध्यापकाचे नाव आहे.
या घटनेनंतर सर्वत्र परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. एकीकडे दिवसेंदिवस मराठी शाळांची अवस्था वाईट होत असताना जे उरलंय त्या ठिकाणीसुद्धा असा गलिच्छ प्रकार घडल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. मुख्याध्यापकच दारू पिऊन शाळेत आल्यानंतर सर्वांच्या भुवया उंचवल्या आहेत. त्यामुळे दारुड्या मुख्याध्यापकावर कारवाईसाठी जिल्हा परिषद सीईओंकडे तक्रार करण्यात आली आहे.

Leave a Reply