हिंदू तरुणाशी मैत्री केली म्हणून मुस्लिम तरुणाला मित्रांनी केली बेदम मारहाण

बंगळुरू : ३१ ऑगस्ट – सर्वधर्मसमभाव आणि सौहार्दावर देशभरात चर्चा होत असताना कर्नाटकमध्ये याच्या उलट प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. एका हिंदू तरुणीशी मैत्री केली म्हणून एका मुस्लिम तरुणाला त्याच्याच कॉलेजमधील इतर तरुणांनी बेदम मारहाण केल्याची घटना कर्नाटकच्या दक्षिण कन्नड जिल्ह्यात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मारहाण करणाऱ्या तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एकीकडे बंगळुरूमधील हुबळी धारवाड इदगाहमध्ये गणेशोत्सव साजरा करण्यासंदर्भातली वाद सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला असताना दुसरीकडे कर्नाटकमधील हा प्रकार घडल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
एएनआयनं पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटकच्या दक्षिण कन्नड जिल्ह्यातील एका कॉलेजमध्ये हा प्रकार घडला आहे. या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मोहम्मद सनिफ या तरुणाने सुलिया नावाच्या एका हिंदू तरुणीशी मैत्री केल्यामुळे त्याला मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीसंदर्भात पोलिसांत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी मारहाण करणाऱ्या तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दिक्षित, धनुष, प्रज्वस, थनुज, अक्षय, मोक्षित, गौतम अशी यातल्या काही तरुणांची नावं तक्रारीमध्ये देण्यात आली आहेत.
कर्नाटकमधील हुबळी धारवाडच्या ईदगाह मैदानात यंदा गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. आधी या मैदानावर गणेशोत्सव साजरा करण्याची परवानगी देण्याच्या आदेशाला कर्नाटक उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. मात्र, उच्च न्यायालयाने रात्री उशिरा १० ते १२ दरम्यान सुनावणी करत हुबळ-धारवाड महापौरांच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. तसेच ईदगाह मैदानावर गणेशोत्सवाला सशर्त परवानगी दिली. आता याविरोधात थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका करण्यात आली आहे.

Leave a Reply