नागपूर : १० ऑगस्ट – महाराष्ट्राची उपराजधानी आसलेल्या नागपूर शहरामध्ये पावसामुळे अनेक वस्त्यांमध्ये जागो जागी पाणी साठले त्यामुळे शहरातील नागरिकांना अतिशय त्रास भोगावा लागत आहे, याची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल चा वतीने प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांचा नेतृत्वात आज नागपूर महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांना निवेदन देऊन लवकरात लवकर प्रश्न सोडवावा अशी सूचना देण्यात आली जर समस्येचं निराकरण न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा ईश्वर बाळबुधे यांनी दिले.
पावसाळ्याचा निमित्ताने “स्वच्छ नागपूर सुंदर नागपूर” अशी घोषणा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांची पोल खोल होतांना दिसत आहे म्हणून येणाऱ्या निवडणुकीत खोट्या घोषणा करणाऱ्या लोकांना संधी देण्यापेक्षा काम करणाऱ्या लोकांना जनतेनी विचारपूर्वक संधी द्यावी !!
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल चे नागपूर शहर अध्यक्ष अरविंद भाजीपाले, कमलाकर घाटोळे, डाॅ अनिल ठाकरे, बापु चरडे, अनुप जनई, प्रविण चौधरी, अविनाश पारकर, नरेंद्र दलाल, पिंकी शर्मा, राजेश शर्मा, अमोल उके व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते