गडचिरोली : ५ मे – कुरखेडा येथून 7 की मी अंतरावर मांलेवाडा रोडवर सालइटोला गावा जवळ काल रात्रौ 9:30 वाजता च्या दरम्यान टाटा मॅक्स गाडी एका झाडाला आदळली त्यात ड्रायव्हर व जवळ बसलेला एक व्यक्ती फसून होते परंतु रात्र भर त्यांच्या मदतीला कुणीही आला नाही सकाळी रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या चे लक्ष पडले परंतु ड्राइवर व सोबतचा समोर च्या कॅबिन मध्ये येवढे फासून होते की गॅस कटर शिवाय निघू शकत नव्हते त्यात दीपक मेश्राम शिवनी यांनी सकाळी सहा वाजता शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्र सिंह चंदेल यांना मोबाईल वर माहिती दिली अपघात झालेला आहे व गॅस कट्टर व रुग्णवाहिका घेऊन या त्याच क्षणी जिल्हा प्रमुख सुरेंद्र सिंह चंदेल माजी नगर सेवक पुंडलिक देशमुख खुशाल बनसोड संजय देशमुख आशिष चुदरी गोलू धांडे अपघात ग्रस्त च्या मदतीला अंबुलन्स व संजय देशमुख यांचे मालकीचे गॅस कटर घेऊन अपघात स्थळी पाहोचले तो पर्यंत मध्यप्रदेश गंगासागर येथील 70/80 ग्रुप चा साडी विकणारे मिनी ट्रक ने अपघात ग्रस्त स्थळा जवळून जात होते त्यांना ही थांबवून दीपक मेश्राम आणि बंटी देवढगले यांनी गाडी बाहेर काढण्या साठी त्यानाही थांबविले जिल्हा प्रमुख सुरेंद्र सिंह चंदेल पुंडलिक देशमुख खुशाल बनसोड गोलू धांडे आशिष चुधरी आणि उपस्थित लोकांच्या मदतीने अपघात ग्रस्तांना काढून रुग्णवाहिकेने उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा येथेभरती केले अपघत ग्रस्त टाटा मॅक्स ही नागपूर ची गाडी आहे